कोरची तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित-अध्यक्षपदी शालीकराम कराडे यांची तर सचिवपदी आशिष अग्रवाल

✒️कोरची(वशीम शेख,विशेष प्रतिनिधी)मो:-9404925488

कोरची(दि.18ऑगस्ट):- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुध्दा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात लालचंद जनबंधू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरची तालुका पत्रकार संघाची अविरोध निवड करण्यात आली.यात अध्यक्षपदी शालिकराम कराडे यांची तर सचिवपदी आशिष अग्रवाल यांची एक मताने निवड करण्यात आली.

या वेळी देश स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करीत असताना तालुक्यात भेडसावत असलेल्या समस्यांवर सर्व पत्रकारांनी विचारमंथन करून तालुक्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून बातम्या प्रकाशित करण्याचे ठरले.

तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी याप्रमाणे, अध्यक्षपदी शालिकराम कराडे पुण्यनगरी, सचिव आशिष अग्रवाल नवभारत, उपाध्यक्ष सुरज हेमके तरुण भारत , संघटक राष्ट्रपाल नखाते देशोन्नति , कोषाध्यक्ष श्याम कुमार यादव पुण्यनगरी यांची एकमताने निवड करण्यात आली तर सदस्यपदी लालचंद जनबंधू ,नंदकिशोर वैरागडे, भुमेश शेंडे, वसीम शेख, अरुण नायक,विनोद कोरेटी, मधुकर नखाते, चेतन कराडे यांची निवड करण्यात आली .असून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सचिव नंदकिशोर वैरागडे यांनी नवीन युक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED