एम्बीशन इंग्लिश स्कूलच्या वतीने पत्रकार अमजद पठाण यांना बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित…. विविध क्षेत्रातील मान्यवरां पुरस्कार

✒️चौसाळा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चौसाळा(दि.18ऑगस्ट):- आजादी का अमृत महोत्सव निमित्त एम्बीशन इंग्लिश स्कूल नेकनुर व बरड फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने १५ आगस्ट रोजी संस्थांच्या वतीने बरड फाटा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ ढाकणे सर यांनी केले होते .या वेळी दैनिक बीड रिपोर्टर नेकनुर चे पत्रकार अमजद पठाण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

एम्बीशन इंग्लिश स्कूल बरड फाटा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या वेळी संस्था चालक डॉ ढाकणे सर यांनी नेकनुर व बरड फाटा परिसरातील विविध क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विषेशता स्वतंत्र सैनिक, माजी सैनिक, जेष्ठ नागरिक,सेवा निवृत्त शिक्षक, पत्रकार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ ढाकणे सर यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक शिवाजीराव डोईफोडे, माजी सैनिक योगिराज रोकडे, शिंदे, सेवानिवृत्त शिक्षक जालिंदर नन्नवरे सर, एल. पी. करांडे सर, फहीमोद्दीन सर, पठाण उस्मान सर, जाधव सर यांना साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.

तर पत्रकार सय्यद खालेद (झुंजार नेता) पत्रकार अमजद पठाण (रिपोर्टर)तुळजीराम शिंदे (बीड चंपावती पत्र )वाघमारे, सय्यद अरशद यांना बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . यावेळी जेष्ठ नागरिक माजी सरपंच जय जयराम कदम यांचा सत्कार करण्यात आला आहे.या वेळी माजी केंद्रप्रमुख तथा सेवानिवृत्त आदर्श शिक्षक फहीम सर व करांडे सर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

या वेळी लहान लहान बालकांनी इंग्रजी मध्ये भाषणे केली व देशभक्तीपर गीतावर कला सादर करुन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली या वेळी या लहान विद्यार्थ्यांचे माता पालक नातेवाईक शिक्षण प्रेमी नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूल संस्थापक प्राचार्य डॉ ढाकणे सर , सपकाळ सर , डोईफोडे सर तुकाराम खंदारे ,वाघ मॅडम , पायल मॅडम , मुरकुटे मॅडम , शिल्पा मॅडम , मस्के मॅडम , भक्ती देशमुख मॅडम , सोनाली पिसे मॅडम , पिसे ताई , मयुरी ताई ,यांनी आहोरात्र परिश्रम घेतले आहेत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED