पूर ओसरला मन शांत झाला पण शेतकरी हवालदिल झाला

43

🔹शासनाने शेतकऱ्याचा काळीज बनून मदत करावी- रोशन मदनकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18ऑगस्ट):- दोन दिवसांपासून येणाऱ्या संतधार पावसाने, सर्व सरोवरांचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले होते. यात प्रकल्प पुजारीटोला , संजय सरोवर, बावनथडी , धापेवाडा , गोसेखुर्द यांचा समावेश होता. या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यानी सर्व जनतेला भयभीत करून सोडले होते. पूर वाढत होता लोकांची चुलबुल चालू होती पूर वाढेल काय, महापूर येईल काय असं वाटत होतं परंतु तिसऱ्या दिवसाला पूर ओसरायला लागला आणि मनाला शांती झाली. परंतु माझा शेतकरी मात्र हवालदिल झाला.

कुणी सहज पूर बघायला गेली, कुणी स्टेटस ठेऊ म्हणून पूर बघायला गेली, परंतु शेतकऱ्याला हे पूर पहायची सुद्धा हिम्मत नव्हती कारण त्या पुराणे शेतकऱ्याच्या पोटाची खळगी भरणारी वस्तू हेरावून घेतली होती. कसा त्या पुरा जवळ जाणार शेतकरी , कारण त्या पुराणे शेतकऱ्यांना रडावे की हसावे करून सोडले, शेतकऱ्याला हसवायचे असेल तर प्रशासनाने शेतकऱ्याचा काळीज बनून मदत करावी. कारण शेतकरी उभा तर भारत देश उभा. शेतकऱ्याने शेतात धान(तांदूळ), सोयाबीन, कापूस , हिरवी पालेभाजी , ऊस ई. पिकांची लागवड केली होती परंतु रिटर्न्स पुराणे शेतकऱ्याचा जणू काही जीवच घेतला. शक्यतो जेवढया लवकर जमेल तेवढ्या लवकर हवालदिल शेतकऱ्याला रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करावी या प्रतीक्षेत पूरपरिस्थितीत सापडलेला शेतकरीवर्ग आहे.