नगरपंचायत कोरपना येथे माहिती अधिकार कायद्याचा सर्रासपणे उल्लंघन-मोहब्बत खान यांचा आरोप

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.18ऑगस्ट):-भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला. अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही नगरपंचायत कोरपना येथे ३० दिवस लोटूनही माहिती दिली नसल्याने माहिती अधिकाराची अवहेलना झाली आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्यासाठी तीव्र लढा दिला. शासनस्तरावरून माहिती अधिकाराचा कायदा करण्यास भाग पाडले आणि माहिती अधिकाराचा कायदा २००५ मध्ये अंमलात आला. परंतु अनेक प्रशासकीय अधिकारी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून माहिती दडविण्याचा प्रयत्न करतात.

असाच प्रकार नगरपंचायत कोरपना यांच्या अधिनस्त येत असलेल्या मोबाईल टॉवर्स कंपनीचे नाव, टॉवर्स विषयी दस्तावेज परवानगी साठी लागणारे प्रदूषण मंडळ, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, आणि फायर सेफ्टी यांचे ना हरकत प्रमाणपत्र, जागा मालकाचा सातबारा मोबाईल कंपनी आणि जागा मालकामध्ये झालेला करारनामा, नगरपंचायत कोरपना द्वारे मोबाईल टॉवरचे आणि जागेची केलेले निरीक्षण अहवाल, मोबाईल टावरचे प्रत्येक मासिक किंवा वार्षिक निरीक्षण अहवाल च्या प्रती हे माहितीच्या अधिकार लोगोसहीत साक्षांकित करून द्यावी २०१५ ते २०२२ या कालावधीत संदर्भात माहिती अधिकारात मोहब्बत खान सत्तार खान यांनी माहिती मागितली असता महिना लोटूनही माहिती देण्यात आली नाही.

असे अनेक माहिती अधिकार अर्ज नगरपंचायत कोरपना येथे धुळखात कचऱ्याच्या डब्यात जमा झालेले आहेत जनमाहिती अधिकारी, प्रशासन अधिकारी/ मुख्याधिकारी यांना पत्र दिले असुन सदर माहिती अर्जावर कुठल्याच प्रकारची दखल घेतल्या गेलेली नसून माहिती मागणारे मोहब्बत खान यांना माहिती न देऊन माहिती अधिकाराची खिल्ली उडविली. भ्रष्टाचार/गैरव्यवहार उघड होवू नये म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप मोहब्बत खान यांनी केला आह.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED