आदर्शमाता प्रतिष्ठान चे कार्य कौतुकास्पद- तहसीलदार विजय पवार

38

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.18ऑगस्ट):-दीन-दलित, पददलित वंचित घटकांना आवश्यक त्या मदती बरोबरच गुणवंतांचा सत्कार करून आदर्शमाता प्रतिष्ठान एक महान कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार कराडचे तहसीलदार विजय पवार यांनी काढले.पाडळी (केसे), तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू कुमारी तपस्या दादासाहेब काशीद हिचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी सैदापूर चे सरपंच फत्तेसिंह जाधव, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास मोहिते, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन,सर्व संचालक, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना तहसीलदार विजय पवार म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी किंवा सामाजिक संस्थांनी अष्टपैलू विचार धारेने काम करणे गरजेचे आहे. असा अष्टपैलू विचार करून आदर्शमाता प्रतिष्ठान आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष विश्‍वास माहिते त्यांचे सर्व सहकारी काम करीत असून यापुढे प्रशासनाचे त्यांना संपूर्ण सहकार्य राहील असेही तहसीलदार विजय पवार म्हणाले. यावेळी मानवाधिकार संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षा सौ.सुनिता मदने, मानवाधिकार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीप मदने,इम्रान मुल्ला, जुबेदा मुजावर,सुनिता पाटील, आदर्शमाता प्रतिष्ठान चे सातारा जिल्हा अध्यक्ष संभाजीराव भोसले, प्रतिष्ठानचे आनंदराव बडेकर, संपतराव मोहिते, सौ.संगीता मोहिते, प्रतिष्ठानच्या सचिव सौ.जोश्ना विश्वास मोहिते,अमोल कणसे,नाना पाटसुपे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते