डॉ. ज्ञानेश्वर बागल यांची नेत्रदिपक कार्यप्रणाली

30

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.18ऑगस्ट):-डॉ. ज्ञानेश्वर बागल यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त 15 ऑगस्ट 2022 पासून सायकलने आपली सेवा प्रत्येक रोग्यांच्या घरी जाऊनच करायची हा एक आगळावेगळा निर्णय त्यांनी घेतला.)

डॉ. ज्ञानेश्वर उत्तमराव बागल (समुदाय आरोग्य अधिकारी) उपकेंद्र देवसरी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे कार्यरत असलेले त्यांनी अमृत महोत्सव निमित्त काही नवीन निर्णयाची स्वतःची स्वतःवरच सांगड घातली.

त्यामध्ये त्यांनी स्वतः ठरवले आपल्या कार्यक्षेत्रातील देवसरी, दिघडी, कारखेड या गावात प्रत्यक्ष स्वतःच्या सायकलने जाऊन रुग्णांना सेवा दयायची व लोकांना आरोग्य दायी जीवन जगण्याची प्रेरणा दयायची
रोग्यांची सेवा आपल्या हातातून झाली पाहिजे. रोग्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा निर्णय त्यांनी घेतला.

अनेक डॉक्टर लोक आपण पाहतो खेड्यापाड्यात जाण्यासाठी कोणी धजत नाही प्रत्येकाला नाविन्यपूर्ण शहरात राहणे आवडते काही काळ असा होता की, खेड्याकडून शहराकडे चला पण बऱ्याचअंशी सुधारणा खेड्यामध्ये झालेली दिसून येते. त्यामुळे शहराकडचा लोंढा किंवा ओघ कमी झालेला दिसतो.

याप्रमाणे डॉ. ज्ञानेश्वर बागल यांची सेवाभावी वृत्ती दिसून येते. त्यांचे प्रत्येकाशी बोलणे चालणे वर्तन अतिशय सुस्वभावी आहे.

मागील आठवड्यात भगवती देवी विद्यालय, देवसरी येथे विद्यार्थ्यांचे 90 टक्के लसीकरण त्यांच्या टिमने केले आहे. हे विशेष म्हणावे लागेल. अतिशय सुंदर संकल्प तथा राष्ट्रीय इंधन बचत सुद्धा याबरोबर होत आहे.

कारण त्यांचा प्रवास सायकलने होत आहे. त्यांचा आदर्श तुम्ही आम्ही सर्वांनी घेण्यासारखा आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा…!