चंद्रपूर ते कवठाळा बससेवा वेळेवर सुरु ठेवा

🔹माजी सरपंच पारस पिंपळकर यांची आगर प्रमुख स्मिता सूतवणे यांच्याकडे मागणी

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.18ऑगस्ट):- कोरोना नंतर दोन वर्षांनी प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्या आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्याने आंदोलन असल्याने त्याच्या फटका देखील बस सेवेला बसला आहे. आता देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्याकरिता बससेवा नसल्यामुळे त्यांच्या फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे वेळेवर बससेवा सुरु करा अन्यथा आंदोलन फुकारु असा इशारा माजी सरपंच पारस पिंपळकर यांनी आगर प्रमुख स्मिता सूतवणे यांना निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

चंद्रपूर शहरालगत असलेले पिपरी, धानोरा, दाताळा, देवाळा, वेंडली, भोयगाव, कवठाळा या मार्गावरील विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता चंद्रपूर येथे येतात. प्रवास करताना त्यांना एसटी बसची मदत घ्यावी लागते. परंतु वेळेचे नियोजन शून्य कारभाराच्या फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. विशेष म्हणजे या बससेवेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी देखील येतात. त्यामुळे सायकळच्या सुमारास त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न निर्माण होऊ शकतो.

विशेष म्हणजे या मार्गावरील ४० ते ५० विद्यार्थी या एसटी बससेवेच्या वापर करीत असतात. चंद्रपूर येथील त्यांचे महाविद्यालय ४. ३० सुमारास सुटतात. परंतु या मार्गावरील बसची वेळ ६ वाजता असून ती ७ वाजता बस्थानकावरून सुटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत राहावे लागते. त्यामुळे या बसची वेळ ५.३० करण्यात यावा हि मागणी या क्षेत्राचे माजी सरपंच पारस पिंपळकर यांनी आगर प्रमुख स्मिता सूतवणे यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED