पुरपीडित शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट मदत द्या

29

🔹वंचित बहुजन आघाडी ची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.18ऑगस्ट):-मागील एक महिन्यापासून ब्रम्हपुरी तालुक्यात सुरु असलेल्या वैनगंगा नदीच्या पुरामुळे व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक गावे पुरबाधित झालीत. यामध्ये धान, तुर, भाजीपाला असे अनेक पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली. लगातार पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा पुर आल्यामुळे तालुक्यातील जनतेचे खुप हाल झाले. अश्या परिस्थितीत शेतकरी हा पुर्णपणे आर्थिक व मानसिक दृष्ट्या खचलेला आहे. होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी व ग्रामीण जनता आत्महत्या शिवाय पर्याय नाही असं मत व्यक्त करतांना दिसत आहे. या सर्व बाबींचा शासन व प्रशासनाने गांभिर्यपूर्वक विचार करुन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घरांची पडझड झालेल्या लाभार्थ्यांना तात्काळ पंचनामा करुन सरसकट त्वरित मदत करावी.

अश्या आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी तालुका ब्रम्हपुरी च्या वतीने उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. तसेच मागणी पुर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते डॉ प्रेमलाल मेश्राम, जिल्हा आय टी सेल प्रमुख लिलाधर वंजारी, तालुकाध्यक्ष सुखदेव प्रधान, युवा अध्यक्ष सुशील{ पिंटु} बन्सोड, युवा महासचिव एजुस गेडाम, उपाध्यक्ष अनिल कांबळे, जि परिषद प्रभारी कमलेश मेश्राम, शहर अध्यक्षा मनीषा उमक, शहर महासचिव सुकेशनी बन्सोड महिला आघाडी, दीक्षित गजभिये, जयप्रकाश धोंगडे, उपाध्यक्ष नरेंद्र मेश्राम, डी एम रामटेके, बिल्डर रामपाल यादव साहब नागपुर, रोहित यादव, धनपाल मेश्राम आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.