ब्रह्मपुरी तालुक्यातील शेत पाण्यात व पिके गेली खरडून-शासनाने तात्काल पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी नामदेव ठेंगरी यांची मागणी

🔸शेतकरी आर्थिक मदत मिळण्याच्या प्रतिक्षेत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.18ऑगस्ट):- तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर आला आणि अनेकांची जीवीतहानी, वित्तहानी झाली. ब्रह्मपुरी तालुक्यात येथे वैनगंगा नदी आणि नाले तुडुंब भरल्या गेले होते. पिकांमध्ये अक्षरशः नदीचे स्वरूप आले असून भात पिकाचे, तूर, कापूस व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतपिके जळून व खरडून गेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आणि त्यावरही अतिवृष्टीमुळे तिबार पेरणीचे संकट उद्भवले आहे.

शेतातील बचावलेल्या पिकांची अतिवृष्टीमुळे वाढ थांबली असून हाती काहीच लागणार नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. नुकतेच महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी जाहिर करून आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले आहे. गावपातळीवरून शासनाकडे अहवाल सादर होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर आर्थिक मदत मिळावी आणि आलेले आर्थिक संकटाला हातभार लागावा या प्रतिक्षेत शेतकरी बांधव आहेत. असे नामदेव ठेंगरी बोलत होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED