“वनराई वृक्ष लावा चळवळ” ही एक सामाजिक बांधिलकी

29

   ✒️लेखक:-गजानन गोपेवाड

      (मो:-7378670283)

        🌳वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.

🌲एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, मोठे झाल्यावर त्याचे फळ खाऊ.

कुठले हि फळ मिळविण्यासाठी कष्टाची गरज असते. फळे सहजासहजी मिळत नसते. फळ मिळवण्यासाठी सतत धडपड करणे, कष्ट करणे, व कष्ट करून धडपड करून मिळालेली उद्दिष्ट हे आपलं फळ असते. हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो. अन्यथा आपल्याला सहजासहजी हातात आलेल्या वस्तूची किंमत नसते.
आज जागतिक वातावरण प्रदूषणामुळे, रसायनिक धुरामुळे, मोठे औद्योगिक रासायनिक अभिक्रिया करून निघणारा धूर हा विषय असतो. तसेच जतन इंधन म्हणून ग्रामीण भागातील लोक वस्ती ही जंगलातील झाडे तोडून त्याचा उपयोग कशासाठी करतात? दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. परंतु त्या प्रमाणात झाडे वाढलेली आपणास दिसत नाही. आपण पाहतो आजूबाजूचे डोंगरांमध्ये टेकडी ओसाड जागेत एकही झाड आपल्याला दिसत नाही परिणामी जमिनीची धूप होते. त्यानंतर पाऊस पडला की माती तिथे पाण्याबरोबर वाहून जाते.जमिनीवर मातीचा थर होण्यासाठी किती वर्षे लागतात. आणि साध्या जातो म्हणून संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपला प्राणवायू असलेला ऑक्सिजन हासुद्धा वसुंधरेवर दिवसेंदिवस कमी होत आहे. एकीकडे लोकसंखेच्या भस्मासुर व दुसरीकडे जंगल तोड, वृक्षतोड यामुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसतो. वृक्षतोडीमुळे आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागत आहे. याचे उदाहरण हिमालय पर्वतावर बर्फाचे पाणी होणे चालू आहे,याचे मुख्य कारण जागतिक तापमानामध्ये वाढ झालेली आहे.ही वाढ रोखण्यासाठी आपणास व आपल्या भावी पिढीसाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. वृक्ष हे आपले जीवन आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वृक्षा पासून औषधी मिळते, फळ मिळते, घरासाठी लाकूड मिळते, इंधन मिळते. वृक्ष लावत नाही याचे दुष्परिणाम गंभीर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक व त्या वाहतूकी मधून येणारा धूर या प्रकारचे वायू आपल्या श्वासोच्छवास वाटे आपल्या पर्यंत जातात. मानवाला गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे.हे टाळण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. शासनाचे उपक्रम आहे म्हणून नाही चालणार, त्यामध्ये सामाजिक बांधिलकी असायला पाहिजे. आपल्या शाळेमध्ये पाचवा वर्ग आहे,विद्यार्थी शाळा सोडताना त्यांच्याकडून त्यांची आठवण म्हणून एक झाड जर आपल्या शाळेच्या आजूबाजूला जागा मिळेल तिथे लावली तर त्या मुलांची आठवणीत झाडा मार्फत होऊ शकते.तसेच वैद्यकीय महाविद्यालय असे विद्यार्थ्यांनी आपली आठवण म्हणून एक झाड लावणे गरजेचे आहे.                         यामधून देशात सामाजिक भावना निर्माण होईल व झाड लावल त्याचा आनंद त्याची आठवण त्या विद्यार्थ्यांना कायमची स्मरणात राहते. अशा पद्धतीने आपण झाडे लावू शकतो.तसेच वाढदिवसासाठी एखादे झाड स्नेह व्यक्तीसाठी भेट म्हणून देतो त्यात त्यांना फार आनंद होईल.शिक्षक देखील उन्हाळ्यामध्ये कडुनिंब की व रस्त्याच्या दुतर्फा लावलेले झाडे मी स्वतः पाहिलेली आहेत. जमा करून जर लावले तर शंभर पैकी एकही राहणार नाही. एखादी मुलगी लग्न होऊन नवीन घरी गेली तर त्या मुलीने नवीन घरांमध्ये पदार्पण केल्याने तिची आठवण म्हणून तिने घर सोडताना सुद्धा एक झाड लावलं पाहिजे, तर तिथे त्या मुलीची आठवण राहू शकते.
                                           

                                            ✒️गजानन गोपेवाड                                                         (राज्य समन्वयक
                               अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.)

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳