चंद्रपूर महासागर संपादक यांच्या पत्नीवर हमला

103

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

वणी तालुक्यातील नायगाव बस स्थानकावरून चंद्रपूर येथे जात असताना अज्ञात आरोपीने पाठीमागून हमला केला यात वैशाली (चल्लावार) जितेंद्र मशारकर (43)वर्ष या गंभीर जखमी झाल्या त्यांना ताबडतोब घुग्घूस येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.त्या महासागरचे संपादक जितेंद्र मशारकर यांच्या पत्नी आहे.

सविस्तर वैशाली चल्लावार (43)वर्ष रा. चंद्रपूर ह्या वणी तालुक्यातील नायगाव येथे जिल्हा परिषेद प्राथमिक शाळा येथे शिक्षिका आहे. त्या रोज चंद्रपूर येथून नायगाव येथे बसनी येणे जाणे करतात. नेहमी प्रमाणे त्या आज शाळेत गेल्या शाळा सुटल्यानंतर त्या 5.30 वाजता दरम्यान चंद्रपूर येथे जाण्यासाठी नायगाव बस स्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होत्या व जाणाऱ्या वाहनाना लिफ्ट मागत असताना अज्ञात आरोपीने पाठी मागून कोणत्या तरी हत्याराने हमला केला यामुळे त्यांच्या मानेवर गंभीर मार लागला.त्यांना ताबडतोब घुग्घूस येथील दवाखान्यात उपचारासाठी पाठविण्यात आले.

घटनास्थळी शाळेच्या व कॉलेजच्या मुली होत्या.हमला होताच त्या मुलीची पळापळ झाली व घटनेची माहिती नागरिकांना देण्यात आली नागरिकांनी ताबडतोब घटना स्थळाकडे धाव घेतली  आरोपी शेतातून पळून जात असल्याचे लक्ष्यात येताच नागरिकांनी आरोपीचा पाठलाग केला व त्याला पकडले. या घटनेची माहिती घुग्घूस व शिरपूर पोलिसांना देण्यात आली घुग्घूस पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली परंतु आरोपी आढळून आला नाही यामुळे  शिरपूर पोलिसांना या घटनेची माहिती देऊन घुग्घूस पोलीस परत आले. मात्र नागरिकांनी पाठलाग करून आरोपीला पकडले त्याच वेळेस शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलीस आले व आरोपीला नागरिकांच्या ताब्यातून घेऊन घुग्घूस येथे आणले व उपचार घेत असलेल्या शिक्षिकेचे बयान घेऊन आरोपीला शिरपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय रामेश्वर कांडुरे, अनिल सुरपाम, विनोद मोतीराम व विनोद कोपटवार हे घेऊन गेले.

अज्ञात आरोपी हा चंद्रपूरचा असल्याचे सांगितले जाते. वृत लिहीत पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय. रामेश्वर कांडुरे करीत आहे.