घूग्घुस गावामध्ये फॉगींग करा – आम आदमी पार्टी ची मागणी

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घूग्घुस(दि.19ऑगस्ट):- गावामध्ये मागील २० दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पडल्यामुळे सर्वत्र पूर आलेला होता ज्यामुळे पसरलेल्या घाणीच्या साम्राज्या मुळे डास पसरलेले आहे.जागोजागी साचलेले पाणी ज्यामुळे डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांना घुग्घुस येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.याची दखल घेत आम आदमी पार्टी घूग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी नगरपरिषद कार्यालय घूग्घुस इथे निवेदन दिले व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता लवकरात लवकर नगरपरिषद द्वारा फॉगींग करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED