पाटकूल येथील जिल्हा परिषद सातपुते वस्ती शाळेमध्ये दहीहंडी उत्सवात साजरी

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुल(दि.20ऑगस्ट):-  जिल्हा परिषद शाळा सातपुते वस्ती पाठवून तालुका मोहोळ या शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदाने साजरा. यावेळी पाटकुल गावचे सरपंच शिवाजीराव वसेकर ग्रामपंचायत सदस्य उषा चौधरी व शाळेचे मुख्याध्यापक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेतील ३०४ विद्यार्थी उपस्थित होते. प्राथमिक जिल्हा परिषद शाळा सोलापूर जिल्हा CEO श्री दीपक स्वामी यांच्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाबरोबरच देण्याच्या पार्श्वभूमीवर या शाळेत आनंददायी पद्धतीने उपक्रम राबवले जातात. सातपुते वस्तीशाळा असून या शाळेत भोवती फक्त २० घरे असून शाळेचे पट ३०४ आहे. या शाळेतील सर्व शिक्षक उपक्रमशील असून सर्व शिक्षक, शिक्षणाबरोबर, संस्कृती कार्यक्रम मनापासून घेतात.

या दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्त शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, पालक शिक्षक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रांगणात झाडाला बांधण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रांगणात बांधण्यात बांधलेल्या दहीहंडी रंग भिंगरी कापडामध्ये असणारी मुले गाण्याच्या तालावर ठेका धरणारे विद्यार्थी मानवी मनोरे असे वेगळे चित्र पाहण्यास पालक वर्ग बहुसंख्य ने उपस्थित होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री घनश्याम गलांडे, उपशिक्षक अरविंद भंडारे ,शिक्षक धनाजी इंगळे ,दत्तात्रेय धुळवे ,रत्नदीप जानराव ,संजय पवार यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कष्ट घेतले.

यावेळी पाटकुल गावचे सरपंच सरपंच श्री शिवाजीराव वसेकर ग्रामपंचायत सदस्य सौ उषा चौधरी,शाळा व्यवस्थापन शालेय समितीचे अध्यक्ष दीपक शेटे उपाध्यक्ष सौ कान्होपात्रा वसेकर, शिक्षण प्रेमी सदस्य मनोज अण्णा सातपुते, भाऊराव ननवरे, दीपक काळे, सौ अश्विनी सातपुते, सचिन सातपुते, रमेश साठे, किसन नामदेव गणेश सातपुते, आप्पाराव वसेकर सातपुते वस्ती शाळेतील शिक्षक शिक्षिका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED