ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे फोटोग्राफर बांधवांचा सत्कार

34

🔹फोटोग्राफर हे आठवणींना संग्रहित करणारे प्रतिभावान मित्र – विवेक बोढे

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20ऑगस्ट):- येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे फोटोग्राफर बांधवांचा सत्कार शुक्रवारी, १९ ऑगस्ट रोजी करण्यात आला.

फोटोग्राफर दिनाचे औचित्यसाधून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते घुग्घुस परिसरातील फोटोग्राफर बांधवांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपा नेते निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप, रत्नेश सिंग, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, तुलसीदास ढवस, सतीश कामतवार, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र वाघमारे, सचिव तिरुपती कंदनुरी उपस्थित होते.

याप्रसंगी घुग्घुसचे जुने प्रसिद्ध फोटोग्राफर मोहम्मद इसाक शेख, किसन गोहने, सावरदास धोटे, आनंद कांबळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच फोटोग्राफर बांधवांना ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कुल जारचे वाटप करण्यात आले.

मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, प्रत्येक व्यवसायात परिश्रम केल्यावर आपल्याला सर्व गोष्टी साध्य करता येते. कालांतराने काळ बदलत गेला आहे. विश्व बदलत गेले आहे ते जुने विश्व कसे होते हे बघायचे असेल व मागे वडून पाहायचे असेल तर जुनी फोटोग्राफी बघण्याशिवाय पर्याय नाही. जर फोटोग्राफी नसती तर आज जुने विश्व कसे होते ही माहिती मिळाली नसती. १९४७ चा स्वातंत्र्यसंग्राम हा कसा होता व स्वातंत्रवीरांची ओळख फोटोग्राफीच्या माध्यमातून होते व ते चित्र दिसते. सुख व दुःख दाखविण्याचे काम फोटोग्राफर करतो.

यावेळी मुकेश कामतवार, राकेश फुलझले, अमोल पत्रकार, विशाल खोब्रागडे, निखिल भोस्कर, सुमित चतुरकर, रवी काळे, जिवन देशभ्रतार व फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.