अवैद्य दारु वाहतुक करणारा अटक

39

✒️प्रतिनिधी सातारा-खटाव(नितीन राजे)

खटाव(दि.20ऑगस्ट):-पुसेगाव फलटण रस्त्यावर पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत. अवैद्य दारू वाहतूक होणार असल्याची माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाल्याने नाकाबंदी करून 3000 रुपयाची दारू व असेंट गाडी असा दोन लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रदिप सोमंना गौडा (35) यास ताब्यात घेतले आहे.मा. अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा. अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा. गणेश किंद्रे उपवभागीय पोलीस अधिकारी सोा. कोरेगाव विभाग यांनी दहिहंडी उत्सवाचे अनुशंगाने पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलींग नाकाबंदी करणेच्या सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे दि. १८/०८/२०२२ सायंकाळी ७ वा. चे सपोनि. शितोळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली एक असेंट कंपनीची चारचाकी गाडीतुन अवैद्य दारू वाहतुक,होणार असल्याची माहिती मिळताच पुसेगाव गावचे हद्दीत पुसेगाव ते बुध जाणारे रोडवर नाकाबंदी करुन वाहने तपासt असताना संशयीत चारचाकी गाडी बुध बाजुकडुन पुसेगावकडे येत असताना नाकाबंदी दरम्यान थांबवुन त्याचे गाडीची झडती घेतली असता गाडीत ३५०० रुपये किंमतीचा देशी दारुचा मुद्देमाल सह त्यास ताब्यात घेवुन गुन्हा दाखल करणेत आला. असेंट कंपनीची चारचाकी गाडी MH 11Y 1615 व दारुच्या बाटल्या असा एकुण २,५३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विपुल भोसले करीत आहेत.

सदर कारवाई मा. अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो,सातारा,मा.अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा, मा.गणेश किंद्रे उपवभागीय पोलीस अधिकारी सो, कोरेगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, सदर कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, जगन्नाथ लबाळ, संभाजी माने, पोपट बिचुकले, विलास घोरपडे, सचिन जगताप, हे कारवाई मध्ये सहभागी होते.