पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

🔹नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांचे शासकीय वाहन अडवून अरेरावी

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.20ऑगस्ट):-नाशिक जिल्ह्यातील सतत वादाच्या भोवऱ्यात असणारा पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका पुन्हा टोल नाका येथील कर्मचार्यामुळे चर्चेत आला आहे.नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील मालेगाव येथील शासकीय काम आटोपून शासकीय वाहन नाशिक येथे येत असताना पिंपळगाव बसवंत येथे टोल नाक्यावर अडवून येथील कर्मचार्यांनी पोलिस अधीक्षक पाटील यांना अरेरावी केली आहे. याबाबत‌ सविस्तर माहिती अशी की नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक नाशिक येथे येत असताना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास टोलनाक्यावर येथील कर्मचारी यांनी शासकीय वाहन अकारण अडवून ठेवत अरेरावी भाषा केली आहे ही घटना पिंपळगाव बसवंत येथील पोलिस ठाण्यात समजताच पोलिसांनी टोल नाका येथील कर्मचार्याना ठाण्यात बोलावून खडे बोल सुनावले आहे.

त्यानंतर पोलिस अधीक्षक पाटील नाशिक येथे तातडीने रवाना झाले झाले प्रकारानंतर पोलिसांकडून संबंधित टोल नाका कर्मचारी यांच्या वर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान पोलिस यंत्रणा कडून पाच टोल नाका कर्मचारी यांना पिंपळगाव बसवंत पोलिस यांनी ताब्यात घेतले आहे त्यातील अरेरावी करणार्या एका कर्मचार्यावर कारवाई ची शक्यता व्यक्त होत आहे. पिंपळगाव बसवंत येथील टोल नाका येथे यापूर्वी ही तत्कालीन निफाड चे आमदार अनिल कदम यांचे वाहन अडवल्याचा प्रकार घडला होता . आता पोलिस अधीक्षक यांचे शासकीय वाहन अडवून अरेरावी चा प्रकार घडल्याने पिंपळगाव बसवंत टोल नाका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED