वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमधील नवीन सात अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता

69

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.20ऑगस्ट):-श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मधील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून एम. ए. भाग १ (इंग्रजी, हिंदी, इतिहास, भूगोलशास्त्र व अर्थशास्त्र) तसेच बी. कॉम. भाग १( बँक मेनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटायर) या नवीन सात अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे.

सदर अभ्यासक्रमांना ज्या विद्यार्थ्याना प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यानी महाविद्यालयात प्रवेश अर्ज सादर करून आपला प्रवेश निश्चित करावा. इंग्रजी विषयाकरिता प्रा. डॉ. आर. आर. थोरात, हिंदी विषयाकरिता प्रा. डॉ. डी. पी. जाधव, इतिहास विषयाकरिता प्रा. डॉ. सौ. एस. आर. सरोदे, भूगोलशास्त्र विषयाकरिता प्रा. एस. जे. सकट आणि अर्थशास्त्र विषयाकरिता प्रा. डॉ. एन. ए. पाटील तसेच बी. कॉम. भाग १ च्या बँक मॅनेजमेंट व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयाकरिता प्रा. व्ही. पी. धुमाळ सर आणि एम. ए. मराठी विषयाकरिता प्रा. एस. एस. बोंगाळे यांच्याशी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी संपर्क साधावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले आहे.

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये:
-निसर्गरम्य व सुरक्षित महाविद्यालय परिसर
-सर्व सुविधायुक्त मुले व मुलींचे अद्ययावत वसतिगृह
-मुले व मुलींसाठी NCC, NSS प्रशिक्षणाची सोय
-70000 हजारहून अधिक पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय
-वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
-करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंट विभाग
-राष्ट्रीय व राज्यस्तरावर अनेक पदके व पारितोषिके मिळविणाऱ्या खेळाडूंची परंपरा
-शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये स्थान व गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त करण्याची परंपरा असणारे अग्रगण्य महाविद्यालय
-कला, क्रीडा व शैक्षिणक गुणवत्ता प्राप्त करण्याऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहनपर भरघोस आर्थिक सहाय्य
-उच्चशिक्षित, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग
-माहिती तंत्रज्ञान (IT)साठी अद्ययावत संगणक प्रयोगशाळा
-आदरणीय पी. डी. पाटील क्रीडानगरीमध्ये ४०० मीटरचा ८ लेन धावन मार्ग तसेच इतर सर्व देशी विदेशी खेळांची सुसज्ज मैदाने
-व्यवसायाभिमुख विविध कोर्सेस व प्रशिक्षणाची सोय
-मुले व मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिकेची सोय
-शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी