तान्ह्या पोळ्यासाठी नंदी बनविताना अर्हेर-नवरगाव येथील कालिदास

  57

  ?नागपूर, उमरेड ,चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व ठिकाणी कालिदासाच्या नंदीची मागणी

  ?5,000 हजार ते 60,000 हजार पर्यंत किमतीचे नंदी

  ✒️रोशन मदनकर(उप संपादक)

  ब्रम्हपुरी(दि.21 ऑगस्ट):-वाढत्या शहरीकरणामुळे व तंत्रज्ञानामुळे शेती आणि बैलांची संख्या कमी होत आहे. शहारामध्ये पोळा हा नंदीची पूजा करून साजरा करावा लागत आहे. तान्ह्या पोळ्याचे आकर्षण मात्र कमी झालेले नाही. बालकांच्या विविध स्पर्धा, फॅन्सी ड्रेस आदींनी या उत्सवाची नवलाई वाढतच आहे. भोसल्यांच्या शासन काळात विदर्भात तान्हा पोळ्याचा प्रारंभ झाला. नागपूर मध्ये तर तान्हा पोळा भोसले मंडळी कडून व इतर लोकांकडून डीजे च्या गाज्या- वाज्यात केला जातो. बच्चेकंपनीलाही पोळ्याचा आनंद लुटता येतो. नंदी बनविणे सुद्धा एक अगदी आकर्षणाचा भाग आहे . जो प्रत्येक व्यक्तींचा मन जिंकून घेतो.

  असाच एक कारागीर कालिदास अभिमन वकेकार वय (43) अ-हेरनवरगाव त. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून याचे पहिल्या वर्गाचे शिक्षण झाले आहे. परंतु याचे कौशल्य शिक्षणा पलीकडचे आहे. सर्वात लहान नंदी 5,000 हजार ते सर्वात मोठा नंदी 60,000 हजार अशा किमतीने कालिदास याचे नंदी विकत असतात, कालिदास ने बनविलेल्या नंदीची मागणी नागपूर, उमरेड चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून जवळ पास सर्व गावातील लोकांकडून आहे.

  आतापर्यंत जवळ पास 150–200 लहान मोठे नंदी बनविले आहे.लाकडाचे नंदीच नाही तर लाकडी मुर्त्या त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, कृष्ण यासारख्या मुर्त्या कोरलेल्या आहेत, लाकडी दरवाजे कोरून त्यावर हाताने डिझायनिंग करतात, तसेच महागडे लाकडी कोरीव सोफे बनवतात. लाकडाचे नाहीतर मातीचे तसेच सिमेंट चे मूर्ती त्यामध्ये गणपती, दुर्गा, शारदा, शंकर पार्वती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज इत्यादी त्यांनी मुर्त्या बनविलेल्या आहेत. मातीच्या तसेच सिमेंटच्या मूर्ती बनविण्याचे कौशल्य कालिदास यांच्या मध्ये आहे. या कामातून कालिदास आपले उपजीविका भागवतो, आणि कालिदासच्या या कौशल्याने गावातील व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे मन जिंकले आहे.