उठसुठ खोटे आरोप करणे हाच विरोधकांचा एकमेव धंदा—अमरसिंह पंडित

27

🔹अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत कोळगावातील भाजपा-सेना कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.२१ऑगस्ट):- उठसुठ खोटे आरोप करणे हाच विरोधकांचा एकमेव धंदा आहे, विकासाचे कांही देणेघेणे नाही मात्र आम्ही करत असलेल्या कामावर आरोप करणे आणि विकासात फक्त राजकारण करणे हाच त्यांचा अजेंडा आहे. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही पण कुणी आले तर आम्ही आंगावर आल्यावर काय करु हे तुम्हाला दाखवून देवू असा इशारा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी विरोधकांना दिला. मौजे कोळगाव येथील भाजपा आणि शिवसेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.

गेवराई तालुक्यातील मौजे कोळगांव येथील भाजप आणि शिवसेनेतील असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जेष्ठ कार्यकर्ते मदनराव घाडगे, जयभवानीचे संचालक संदीपान दातखिळ, सरपंच विकास सानप, किशोर कांडेकर, संतोष वाघमारे, श्रीमंत उघडे, सुदाम लोंढे, आविनाश लोंढे, बबन महाराज लोंढे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, कोळगाव येथील कार्यकर्तांचा राष्ट्रवादी प्रवेश हा भाजप आणि सेनेला इशारा आहे. भाजपा आणि सेना नेतृत्वाच्या गलथानपणामुळे कोळगांव येथील जनतेला मोठा संघर्ष सहन करावा लागला आहे. या संघर्षाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केले जाईल. गेवराई तालुक्यातील राजकारण अलीकडे भरकटले आहे. विरोधकांना तालुक्यात काय चालू आहे याचा मेळ नाही. मी किती बोलतो काय बोलतो हे समजून न घेता माझ्यावर टीका केल्या जात आहेत. विरोधकांना तालुक्याच्या विकासाबाबत काही देणे घेणे नाही. राजकारणात फक्त माझ्यावर टीका करणे एवढाच त्यांचा धंदा आहे. उसाचे राजकारण मी कधीच केले नाही आणि यापुढेही करणार नाही. शेतकऱ्यांच्या बाबत चांगले निर्णय घेऊन मी उपाय योजना करीत आहे. विकासात्मक धोरण स्वीकारून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सदैव लोकहितांचेच निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही ते घेतले जातील. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून तालुक्यात सत्तापरिवर्तन केले जाईल असेही ते म्हणाले.

*यांनी केला प्रवेश*
==========
कार्यक्रमात भाजपा-सेनेचे गोविंद गायकवाड, संतोष गायकवाड, मिठ्ठु गायकवाड, सर्जेराव गायकवाड, अविनाश गायकवाड, भिमराव गायकवाड, अतुल गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड, नारायण गायकवाड, नितीन गायकवाड, सचिन गायकवाड, मधुकर गायकवाड, विजय गायकवाड, अर्जुन गायकवाड, प्रकाश गायकवाड, बाळासाहेब पाटील, सचिन घोरपडे नितिन घोरपडे, दत्तात्रय गायकवाड, अरुण गायकवाड, अर्जुन गायकवाड, सुनील गायकवाड, अप्पासाहेब गायकवाड, महादेव गायकवाड, अंकुश गायकवाड, विकास गायकवाड, महादेव गायकवाड, आकाश गायकवाड, शहादेव गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, सुनिल गायकवाड, मोहन गायकवाड, श्रीरग साळवे, आकाश साळवे, परमेश्वर गायकवाड, बाळासाहेब लोनके, बंडु माळी, एकनाथ रावसाहेब बनसोडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोळगाव येथील भाजप शिवसेना पक्षातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करून अमरसिंह पंडित यांना भक्कम पाठिंबा दर्शविला आहे. या कार्यक्रमाला पुरुषोतम लोंढे, रमेश करांडे, आबासाहेब करांडे, आशोक करांडे, बिभीषण करांडे, आसारामजी बारहाते, रमेशराव बारहाते, श२द बारहाते, धनंजय बारहाते, सुरेश जाधव, दिनकर पवार, एकनाथ बनसोडे, बाळासाहेब घाडगे, बळीराम निंबाळकर, भागवत चिर्खे, साथीराम महारगुडे, सुभाष शिंदे, पिंटू पवार, मछींद्र लोंढे, पत्रकार श्रीराम बारहाते, संतराम जोगदंड, आबासाहेब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कोळगाव, गाढेवाडी, खडकी, सैदापूर आधी गावातील कार्यकर्ते, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.