माण तालुक्यातील मलवडी येथे नेत्र रुग्णालयाचे उदघाटन

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.22ऑगस्ट):-वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सचिन खरात यांचे अथक प्रयत्नातून मलवडी,ता.माण येथे रविवारी नेत्र रुग्णालयाचे उदघाटन आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे व लायन्स क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचे हस्ते करणेत आले.या रुग्णालयाचा माण तालुका व मलवडी परिसरातील डोळ्यांचे आजार असंनाऱ्या रुग्णांना याचा लाभ होणार असूनअत्यंत अल्प दरामध्ये डोळे तपासणी ,मोती बिंदू शस्त्रक्रिया ,चष्मे रुग्णांना उपलब्द होणार आहेत.

या उदघाटन सोहळ्यास बाळासाहेब रणपिसे माजी सभापती व वंचित चे सल्लागार,वंचितचे तालुकाध्यक्ष युवराज भोसले,संघटक मिलिंद भोसले,कोशाध्यक्ष संतोष घाडगे,जिल्हाप्रतिनिधी चंद्रकांत खरात,युवा आघाडीचे बादल शिंदे,पत्रकार अतुल खरात ,अमर खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,सचिन खरात,सोनल खरात,अनिता घोरपडे,अमृता मोरे,प्रिया खंडाईत, सचिन महाजन यांनी विशेष प्रयत्न केले,अनिकेत खताळ यांनी सूत्रसंचालन केले.

या रुग्णालयाच्या माध्यमातून गावोगावी डोळे तपासणी शिबीर घेवून चष्मे तसेच योग्य दरात शस्त्रक्रिया करणेत येईल अशी माहिती रुग्णालयाचे संचालक सचिन खरात यांनी दिली.यावेळी संचालक सचिन खरात यांनी सांगितले माण तालुका आणि इतर तालुक्यातील,जिल्ह्यातील गरजू गरीब रुग्णानी या रुग्णालयातील सेवेचा लाभ घ्यावा त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED