श्री संत भगवान बाबा विशेषांकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन

✒️नवनाथ आडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)

बीड(दि.22ऑगस्ट):- विजयादशमी दसरा निमित्त दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या संत भगवान बाबा विशेष अंकासाठी भगवान बाबांच्या जीवनावर आधारित लेख, कविता व दुर्मिळ फोटो यावर आधारित साहित्य पाठवावे, असे आवाहन श्री संत भूमी कला क्रीडा प्रतिष्ठानचे सचिव प्रा. जनार्दन बोडखे यांनी केले आहे.संत भगवान बाबांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज जागृती व प्रबोधनाचे भरीव कार्य केलेले आहे. भगवान बाबांनी त्यांच्या अवतार काळात सामान्यातील सामान्य भक्तांना भगवंत भक्तीची दिशा दाखवली.

अशा थोर महात्म्याला अभिवादन करण्याची परंपरा आम्ही दरवर्षी अंकात राखत आलो आहोत.आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवावे.प्रा. जनार्धन बोडखे. सिद्धी मेडिकल, नवी पेठ, पाथर्डी. जिल्हा अहमदनगर. पिनकोड- ४१४१०२. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक- ९४ २१ ४७ ९१ ८० या नंबरवर संपर्क साधावा.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED