बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राच्‍या ग्रामीण भागात ५५ कोटी ५० लक्ष रू. किंमतीच्‍या विकासकामांना मंजूरी-वन व सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पाठपुराव्‍याचे फलीत

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.23ऑगस्ट):-राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात ५५ कोटी ५० लक्ष रू. किंमतीची रस्‍ते व पुलाची बांधकाम मंजूर करण्‍यात आली आहे.

ग्रामीण भागातील जनतेची रस्‍ते व पुलासंदर्भातील मागणी लक्षात घेता श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला प्रयत्‍न व पाठपुराव्‍याला यश प्राप्‍त झाले आहे. जुलै २०२२ च्‍या पुरवणी अर्थसंकल्‍पात मंजूर विकासकामांमध्‍ये प्रामुख्‍याने बल्‍लारपूर तालुक्‍यातील मानोरा-कवडजई-कोठारी रस्‍त्‍याची सुधारणा ६ कोटी रू., बल्‍लारपूर तालुक्‍यातील माना-नांदगांव-विसापूर रस्‍त्‍याची सुधारणा ३ कोटी ५० लक्ष रू., चंद्रपूर तालुक्‍यातील मरारसावरी-नागाळा रस्‍त्‍यावर अंधारी नदीवरील मोठया पुलाच्‍या पोचमार्गाकरिता भुसंपादन करणे ५० लक्ष रू., चंद्रपूर तालुक्‍यातील तालुका सिमा ते मुल तालुक्‍यातील टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्‍तमंदीर-ताडाळा-हळदी-दहेगांव-मानकापूर-नलेश्‍वर-खालवसपेठ-चिरोली-टोलेवाही-नागाळा रस्‍त्‍याची सुधारणा ४ कोटी ५० लक्ष रू., चंद्रपूर तालुक्‍यातील दुर्गापूर-सिनाळा-वरवट-चोरगांव-मामला-बोर्डा-वलन या रस्‍त्‍याची सुधारणा ४ कोटी रू., मुल तालुक्‍यातील उमरी तुकूम-आंबेधानोरा-डोंगरहळदी-सुशी-नलेश्‍वर-मानकापूर-हळदी-चिचाळा-फिस्‍कुटी-चांदापूर रस्‍त्‍याची सुधारणा १ कोटी ८० लक्ष रू., मुल तालुक्‍यातील पेटगांव-भादुर्णी-मारोडा-मुल-चिचाळा-भेजगांव रस्‍त्‍याची सुधारणा १९ कोटी, मुल तालुक्‍यातील पेटगांव-राजोली-पाथरी रस्‍त्‍याची सुधारणा करणे ३ कोटी ९० लक्ष रू, पोंभुर्णा तालुकयातील वडकुली-चेक बल्‍लारपूर-चिंतलधाबा-केमारा-भटारी ते नविन राष्‍ट्रीय महामार्गाची सुधारणा ३ कोटी रू., मुल तालुक्‍यातील टेकाडी-चिमढा-आकापूर-दत्‍तमंदीर-ताडाळा-हळदी-दहेगांव-मानकापूर-नलेश्‍वर-खालवसपेठ-चिरोली-टोलेवाही-नागाळा या रस्‍त्‍यावर लहान पुलाचे बांधकाम करणे २ कोटी रू., मुल तालुक्‍यातील नवेगांव-गांगलवाडी-भादुर्णी-पडझरी-सोमनाथ-मारोडा या रस्‍त्‍यावर लहान पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ८० लक्ष रू., एमआयडीसी-दाताळा चंद्रपूर रस्‍त्‍यावरील कॅबल स्‍टेड उंच पुलाच्‍या पोचमार्गाचे सिमेंट कॉंक्रीटीकरण, चौपदरीकरण व विद्युत वाहीनींचे स्‍थलांतरण करणे ५ कोटी ५० लक्ष रू. अशी ५५ कोटी ५० लक्ष रू. किंमतीची विकासकामे मंजूर करण्‍यात आली आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने ग्रामीण भागातील जनतेच्‍या जिव्‍हाळयाची रस्‍ते व पुलाच्‍या बांधकामाची कामे मार्गी लागल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED