स्वराज्यक्रांती चे संस्थापक शिवभक्त अंकुश कुमावत राष्ट्रीय पद्म गौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित

30

✒️शांताराम दुनबळे(नाशिक प्रतिनिधी)

नाशिक(दि.23ऑगस्ट):-अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र प्रेणित, स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त अंकुश भाऊ कुमावत यांना एकता फाउंडेशन तथा शिव भीम सेना संस्थापक डॉ. संजय रामटेके यांनी ऑनलाईन कार्यक्रमात स्वातंञ्याचा अमृत महोत्सवनिमित्त औचित्य साधून राष्ट्रीय पद्म गौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित केले.

शिवभक्त अंकुश भाऊ कुमावत हे नेहमी अनाथ विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी, अनाथ, अंध अपंगासाठी अन्नदान मोहिम, गरजु रूग्नांना मोफत रक्कदान तसेच गरजु गरजवंतांच्या सेवेसाठी नेहमी अग्रेसर असतात. त्यांना राष्ट्रीय, अंतराष्ट्रीय, जिल्हास्तरिय व अनेक सामाजिक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना राष्ट्रीय पद्म गौरव पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले, त्यांच्या पुढील वाटचालिस शुभेच्छा.