


✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.23ऑगस्ट):-मानीकगड पहाडावरील जिवती तालुक्यात पुन्हा एक शेतकरी आत्महत्या.दोन आठवड्यात पाच शेतकरी आत्महत्या . अतिशय गंभीर प्रसंग शेतकऱ्यावर येऊन पडला आहे धोंडअर्जुनी येथील युवक वकील गोपीनाथ चव्हाण (वय २२ वर्षे) युवक शेतकरी सततच्या नापिकीमुळे कर्जाला कंटाळून रविवारला आपल्याच शेतात जाऊन विष प्राशन केला.उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जिवती येथे नेण्यात आले तिथे पूर्ण सोयी सुविधा नसल्याने चंद्रपूरला रेफर करण्यात आले.
आज चंद्रपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला,कर्जाला कंटाळून युवक शेतकरी आपली जीवन यात्रा संपविली . त्याच्या मागे आप्त परिवार आई, वडील, बहीण आहे , जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन फोन द्वारे तहसीलदारांना संपर्क साधला व प्रशासनाला विनंती केली आहे की या पीडित कुटुंबियांना तात्काळ तीन लाखाची आर्थिक मदत जाहीर करावी . अन्यथा जय विदर्भ पार्टी तीव्र आंदोलन करेल असाही इशारा दिला.




