नियमांचे काटेकोर पालन करत गणेशोत्सव साजरा करा-गणेश किंद्रे,उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव)

42

✒️सातारा-खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.23ऑगस्ट):-पुसेगाव त .खटाव जिल्हा सातारा येथील पोलीस ठाणे हद्दीतील मंडळाचे बैठक गणेशोत्सव अनुषंगाने , आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा.श्री. गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मंडळांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री.संदिप शितोळे सहा. पोलीस निरीक्षक पुसेगाव पोलीस ठाणे, पोलीस ठाणे हद्दीतील मंडळाचे अध्यक्ष सदस्य व पोलीस पाटील उपस्थितीत. होते.

पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत मा.श्री.गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव विभाग व संदिप शितोळे यांनी गणेशमंडळांना मार्गदर्शन केले.सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाकडे सर्व आवश्यक त्या परवानग्या घेऊन गणेश मूर्तींची स्थापना करावी. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करण्यात यावे असे सांगितले आहे. परंतु याचा चुकीचा अर्थ घेऊ नये.त्यांनी कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत असे जाहीर केले आहे. गणेशोत्सव काळात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गावोगावी शक्यतो एक गाव,एक गणपती मूर्तीची स्थापना होईल यासाठी प्रयत्न करावेत. देखावे हे समाज उपयोगी, समाज प्रबोधनपर असावेत. देखाव्यातून किंवा कार्यक्रमातून सामाजिक,राजकीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. गणपती उत्सव काळात मूर्ती जवळ मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस असणे आवश्यक आहेत.

तसेच मिरवणूक काढताना मिरवणूक मार्गात कोणताही बदल करू नये.डॉल्बीचा वापर करू नये. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. अशा अनेक विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करून उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन केले.

तसेच पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणराया अवॉर्ड 2022 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये सामाजिक उपक्रम, डॉल्बीमुक्त मिरवणूक, सुरक्षा उपाययोजना,स्वच्छता, आशा चांगल्या उपक्रम राबवणारे 3 गणेश मंडळ व एक गाव एक गणपती योजना राबविणारे गणेश मंडळ यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मा.पोलीस अधीक्षक यांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी स्पर्धेमध्ये सर्व गणेश मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन सपोनि शितोळे यांनी केले आहे.