शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा सहविचार सभा

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24ऑगस्ट)-:- येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली.सभेत शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली.राजेंद्र झाडे यांना विधानपरिषदेत निवडून देणे म्हणजे आमदार कपिल पाटील यांचे हात बळकट करणे यावर उपस्थित पदाधिका-यांनी मनोगतात व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूकीत शिक्षक भारतीने सेक्यूलर परिवर्तन पैनलला पाठींबा जाहीर केला व पाठींब्याचे पत्र राजेंद्र झाडे यांनी परिवर्तन पैनलच्या प्रमुख पदाधिका-यांना सुपूर्द केले.
याप्रसंगी नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर,राज्य संघटक सचिव किशोर वरभे,विभागीय कार्यवाह सपन नेहरोत्रा,विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणूकीत सेक्यूलर परिवर्तन पैनलचे निमंत्रक डॉ.सुधाकर पेटकर,डॉ.प्रमोद शंभरकर,माध्यमिक जिल्हाध्यक्ष भास्कर बावनकर,कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे,कार्यवाह राकेश पायताडे,उच्च मा.जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश हटवार,चंद्रपूर शहर अध्यक्ष किशोर दहेकर,कार्यवाह गंगाधर खिरटकर,मुख्याध्यापक संघ अध्यक्ष अनिल वासेकर,आश्रमशाळा जिल्हाध्यक्ष बजरंग जेनेकर,प्राथमिक विभागीय सल्लागार रावण शेरकुरे,राबिन करमरकर,महिला अध्यक्ष रोहिनी मंगरुळकर तथा सिनेट निवडणूकीतील उमेदवार आदी उपस्थित होते.
संचालन विलास खडसे,प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष पुरुषोत्तम टोंगे,आभारप्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष बंडू बरडे यांनी केले.
सहविचार सभेला शिक्षक भारती पदाधिकारी तथा समविचारी संघटनांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.