महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे ) समाज महासंघ अंतर्गत सुतार (झाडे) सखी मंच व महासंघ सुतार (झाडे) युवा मंच वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

69

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.24ऑगस्ट):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित “महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे ) समाज महासंघ अंतर्गत ” महासंघ सुतार (झाडे) सखी मंच व महासंघ सुतार (झाडे) युवा मंच “च्या वतीने रविवार, दिनांक २८ ऑगष्ट २०२२ ला “राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सुतार कारागिरी विषयक रोजगार मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, समाज ज्येष्ठांचा सेवाभुषण सत्कार-२०२२ चे एकदिवसीय आयोजन “राजीव गांधी सभागृह, जयंत टॉकीज जवळ, मेन रोड, चंद्रपूर” येथे करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमाचा उद्‌घाटन सोहळा उद्‌घाटक श्री. संजयजी आ. परसुटकर (अधिक्षक, जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वासुदेवरावजी वांढरे पोलीस उपअधिक्षक (सेवानिवृत) महाराष्ट्र पोलीस, नागपूर आणि विशेष प्रमुख अतिथी म्हणून सौ. हर्षाताई कि. साखरकर अध्यक्षा, सुतार सखी मंच , नागपूर व सुरज भा. वनकर प्रो.प्रा. भुमि एम्पायर बिझिनेस प्रा. लि. चंद्रपूर आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात नरेंद्र वनकर अध्यक्ष, म.वि.म.सु. स महासंघ यांचे हस्ते महासंघ ध्वजारोहण सकाळी ९. 30 वाजता, सामुहिक राष्ट्रगीत गायन सकाळी ९.४० प्रभु विश्वकर्मा प्रतिमा/ मुर्तीचे शास्त्रोक्त पुजन महेश शास्त्रकार अध्यक्ष म. सु. (झाडे) स. चंद्रपूर यांचे हस्ते होईल. सोबतच दिपप्रज्वलन रविंद्रजी बुरडकर अध्यक्ष म. सु. (झाडे) यु. मं व सौ. माधुरीताई शास्त्रकार अध्यक्षा म. सु. स. मं करतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्ती गीत गायन, श्रद्धांजली, महासंघ सुतार (झाडे) सेवाभुषण पुरस्कार – २०२२ (मरणोत्तर व विद्यमान), सुतार कारागिरी विषयक रोजगार मार्गदर्शन, स्नेहभोजन, निबंध स्पर्धा , शैक्षणिक गुणगौरव / सेवाभुषण सत्कार / बक्षीस वितरण, देशभक्ती गीतगायन / सांस्कृतिक कार्यक्रम अनुक्रमे पार पडणार,तरी समाज बांधवांनी बहुसंख्येत व सहपरिवार सामील होऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन महासंघ सुतार (झाडे) युवा मंच चे सदस्य देवा बुरडकर यांचे वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.