ऐतिहासिक शहर परभणी वासियांनी केला डॉक्टर प्रवीण निचत ह्यांचा सुप्रसिद्ध जेष्ठ कलाकार श्री किशोर महाबोले ह्यांच्या हस्ते सत्कार

29

✒️परभणी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

परभणी(दि.24ऑगस्ट):- ऐतिहासिक शहर परभणी वासियांनी केला बदलापुरातील सुप्रसिद्ध निसर्गउपचार तज्ज्ञ व एकपंक्चुरिस्ट डॉक्टर प्रवीण निचत ह्यांचा सुप्रसिद्ध जेष्ठ कलाकार श्री किशोर महाबोले (आई कुठे काय करते सिरीयल मधील अप्पा) ह्यांच्या हस्ते बी. रघुनाथ सभागृह, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, एस. पी. ऑफिस समोर, बासमती रोड, परभणी येथे सत्कार करण्यात आला. डॉ. प्रविण निचत ( अध्यक्ष होप फौंडेशन), मार्फत समाजासाठी विविध उपक्रम चालू असतात, त्यामध्ये अन्न वाटप, औषध वाटप, कपडे वाटप व इतर गरजेच्या वस्तूंचा समाविष्ट आहे.

त्यांचे बदलापूर येथे शतायुषी निसर्ग उपचार केंद्र असून ते वैद्यकीय क्षेत्रात निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर “घरगुती उपाय” सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. त्यांच्या ह्या निसस्वार्थ कार्याची दखल जीवनज्योत कला प्रतिष्ठान महाराष्ट्र व जगदंबा विश्वस्त संस्था, परभणी ह्यांनी घेतली. त्यांना मानाचा फेटा घालून व सुप्रसिद्ध जेष्ठ कलाकार श्री किशोर महाबोले (आई कुठे काय करते सिरीयल मधील अप्पा), ह्यांच्या हस्ते सन्मानपत्र, मेडल व ट्रॉफी देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.

जीवनज्योत कला प्रतिष्ठान महाराष्ट्र व जगदंबा विश्वस्त संस्था, परभणी आयोजित उत्तुंग भरारी शैक्षणिक , कला सामाजिक परिषद परभणी २०२२ बी. रघुनाथ सभागृह, शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, एस. पी. ऑफिस समोर, बासमती रोड, परभणी येथे नुकतीच पार पडली. संमेलनाध्यक्ष होते मा. श्री. के. बी. दडके, परभणी, उदघाटक होते मा. डॉ. सौ. विद्याताई चौधरी, अध्यक्षा जगदंबा विश्वस्त संस्था, परभणी व मा. आचार्य डॉ.गोपालजी ढोमणे सुप्रसिद्ध सायन्टिफिक वास्तुतज्ञ, महाराष्ट्र, निवड समिती अध्यक्ष मा. श्री. एम. एम. शेख, लातूर, व खास आकर्षण होते सुप्रसिद्ध जेष्ठ कलाकार श्री किशोर महाबोले (आई कुठे काय करते सिरीयल मधील अप्पा), आयोजक होते प्रा. डॉ. बी. एन. खरात संचालक समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, निवेदक मा. श्री. वैभव खानोलकर ह्यांनी केले. स्वातंत्र्याच्या रोप्य महोत्सवानिमित्त देश हाच देव मानून मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी उराशी ध्येय बाळगून समाज परिवर्तन करणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांचा कौतुक सन्मान सोहळा होता.