राजस्थान व गुजरात मध्ये झालेल्या घटनेचा जाहीर निषेध मोर्चा

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला) 

येवला(दि.25ऑगस्ट):- – राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील सुराणा गाव येथील तिसरी इत्तेत शिकणारा दलित विद्यार्थी कु.इंद्र मेघवाल याने मुख्याध्यापक यांच्या पाण्याच्या माठातील पाणी पिल्याने येथील मुख्याध्यापक झेलसींग यांनी बेदाम मारहाण केल्याने सदर विद्यार्थी 20 दिवस मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान 15 ऑगस्ट 2022 रोजी मृत्यू पावला तसेच गुजरात मधील गोध्रा हत्याकांडा नंतर झालेल्या दंगलीमध्ये बिल्कीस बानू पाच महिन्याची गरोदर असताना तिच्यावर 11 उच्चवर्णीय नराधमांनी बलात्कार करून परिसरातील सात जणांची हत्या केली त्यांना गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी माफी देऊन सुटका केली त्यामुळे अशा प्रकारच्या घटना समाजाला काळीमा फासणाऱ्या आहेत त्यासाठी अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन मा .तहसीलदार साहेब येवला तहसीलदार कार्यालय येवला यांना देण्यात आले.अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्रभाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी.

निवेदनावर खालील सह्या महेंद्रभाऊ पगारे (तालुकाध्यक्ष) अजहरभाई शेख (शहराध्यक्ष) सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड विनोद त्रिभवन बाळासाहेब आहिरे हमजाभाई मनसुरी शांताराम पवार संतोष निकम अजित पवार भगवान मोरे नाना पिंपळे विष्णू चंदन सुरेश सोनवणे बाळासाहेब सोनवणे अशोक पगारे शाम झाल्टे महेंद्र खळे संतोष आहीरे उत्तम आहीरे समाधान पगारे मोबीन शेख साहिल शेख राजू भाई शेख सुरेश खळे ज्ञानेश्वर भालेराव रामदास त्रिभवन महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ.आशा आहेर ता.सरचिटणीस सौ.स्मिता झाल्टे सौ. ज्योती पगारे सौ.उषा पगारे श्रीमती मंदाताई गायकवाड सौ. नयना सोनवणे सौ.पार्वताबाई पगारे श्रीमती सविता वानखेडे श्रीमती सीताबाई घुसाळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते महेंद्रभाऊ पगार यांच्या नेतृत्वाखाली येवला तहसील कार्यालयाच्या आवारात जमा झाले मोर्चाला सुरुवात होताच जोरदार निषेदाच्या घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयाच्या गेट समोर दाखल झाला यावेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आशा आहेर ता.सरचिटणीस अॅड.स्मिता झाल्टे यांची भाषणे झाली यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष यांनी आपल्या भाषणात जोरदार सरकारवर टीका केली व घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दराने सोडला यावेळी नायब तहसीलदार पंकज मगर मॅडम यांना सारीया समीर शेख ह्या छोट्या मुलीच्या हस्ते निवेदन सादर केले व त्यांनी ते स्विकारले यावेळी पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात होता

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED