रेल्वे पोलिसांच्या पिसीआर मध्ये असलेल्या पारधी समाजाचा तरुणाचा घडला हत्याकांड

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.26ऑगस्ट):- रेल्वे पोलिसांनी पारधी समाजाचा तरुण चोरीच्या संशयावरून पीसीआर मध्ये हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना पुणे रेल्वे स्टेशनला घडली आहे. 25 वर्षांचा नागेश पवार असे तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील आणि त्याला अमृत महोत्सवी दिनी 15 ऑगस्ट ला अटक केली आणि न्यायालयाने 6 दिवसाची पिसिआर दिला या पिसीआर दरम्यान एवढी भयानक मारहाण झाली की काल नगेशच हत्याकांड झालं.

आता पुणे सशून येते त्याचा मृतदेह आहे, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अट्रोसिटी ॲक्ट 302 अंतर्गत कार्यवाही झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भुमिका कुटुंबाने घेतली आहे. ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत असून आजही पारधी समाज केवळ संशयावरून मारला जातो.

इग्रजांनी चोर जमात म्हणून शिक्का मारून गेलेली जमात जर स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी मारली जात असेल तर आम्ही इंग्रजांची गुलामी सोडली का? आदिवासी समूहाचे पारधी समाजाचे स्वातंत्र्य कुठंय?तात्काळ पोलीस अधिकारी, तपास अधिकारी, फिर्यादी सर्वांवर 302, अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही करावी.जयभीम फिल्म या देशात मोठ्या प्रमाणात चालली. त्यातला प्रती जयभीम नागेश पवार चा झालेला आहे.

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED