डॉ खंडू माळवे यांची महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समितीवर उपाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र राज्यातील पर्यटन व कला सांस्कृतिक कार्याला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यटन धोरण २०१६ अंतर्गत सुरू असलेल्या राज्य महोत्सव समितीवर डॉ खंडू माळवे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष उमाजी बिसेन व सचिव राजू पटेल यांनी दिली.डॉ खंडू माळवे हे साहित्यिक असून ते खं र माळवे -खरमा, या नावाने साहित्य निर्माण करतात. त्यांनी अनेक गद्य व पद्द साहित्याचे लिखाण केले आहे. त्यांचा चाळणीवाला या काव्यसंग्रहाचे २०१३ साली महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ यांजकडून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्रीमंडळ यांचे हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे.

आजवर डॉ खंडू माळवे यांनी पाच हजार कविता लेखन केले असल्याने महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड, भारत बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड, गिणिज बुक ऑफ रेकॉर्ड, मध्ये त्यांची नोंद झाली आहे.
मुंबई मराठी साहित्य नायगाव संघाचे सभासद असलेले डॉ खं र माळवे मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ-सल्लागार म्हणून देखील काम पहात आहेत काव्यलेखनासोबत शासकीय व निमशासकीय सेवाभावी कार्य करीत आहेत या त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन भारतीय टपाल टिकिट जारी केले आहे.डॉ खं र माळवे हे भारत व परदेशी अनेक नामांकित पुरस्काराने गौरवण्यात आले आहे यात खास करून माजी राष्ट्रपती डॉ ए, पी, जी अब्दुल कलाम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच अमेरिका प्रेसिडेंट ग्लेन मार्टिन यांच्या हस्ते वर्ल्ड पार्लमेंट सदस्यत्व देण्यात आले.

गुरूब्रम्हा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त असलेले माळवे सावली फाऊंडेशन तर्फे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह व कुलगुरू भालचंद्र मुणगेकर हस्ते सावली जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे.कवी लेखक शाहिर समाजसेवक म्हणून कार्यरत असल्याने सार्वभौम कार्याचा आढावा घेता महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळातील सांस्कृतिक मंत्री तसेच समन्वयक अध्यक्ष उमाजी बिसेन यांचे हस्ते उलेखनीय मानपत्र देऊन उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड जाहिर करण्यात आली. डॉ खं र माळवे यांच्या निवडीचे माजी खासदार डॉ खुशाल बोकचे, सल्लागार सुरेश थोरात, राष्ट्रीय सल्लागार डॉ एस एन पठाण, माजी कुलगुरू व सल्लागार यशवंत गेडाम, डॉ अर्जुन मुरूडकर, तसेच महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED