नगरपालिका कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही; पी एफ न मिळाल्यास बेमुदत उपोषष्ण- ऍड.राजू भोसले

39

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.27ऑगस्ट):-नगरपालिका सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या हलगर्जी पणामुळे दिला जात नाही. तो तात्काळ द्यावा यामागणी साठी सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी सिद्धनाथ मंदिरा पासून नगरपालिके पर्यंत थाळी मोर्चा व आमरण उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक – सचिव अँड. राजू भोसले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

म्हसवड पोलीस स्टेशन मध्ये 50 सफाई कामगारांच्या सह्यांचे निवेदन अ‍ॅड. राजू भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले . यावेळी अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, रघुनाथ लोखंडे हे प्रमुख कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना अ‍ॅड. राजू भोसले म्हणाले कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा तीन वर्षाचा पी एफ व BVG कंपनीचा एक महिन्याचा पगार तात्काळ म्हसवड नगरपालिका मुख्याधिकारी यांनी द्यावा. मुख्याधिकारी यांनी BVG कंपनीला वर्क ऑर्डर दिली. पण मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालया कडून वेळेत प्रशासकीय मान्यता घेतली नाही. परंतु मुख्याधिकारी आणि BVG कंपनी ने दलित मागासवर्गीय गरीब सफाई कामगारांकडून कोरोना काळ असताना सुद्धा सफाई चे काम करून घेतले. गोरगरीब दलित सफाई कामगारांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून म्हसवड शहर व परिसर साफसफाई चे काम केले आहे. असे असताना मुख्याधिकारी व BVG कंपनी गरीब कर्मचारांचा पगार हडफ करत आहेत. या दोघांच्या वादात कर्मचाऱ्यांचा कष्टांचे पैसे कोण देणार? प्रशासकीय मान्यता वेळेत न घेता वर्क ऑर्डर देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करावी व BVG कंपनी ने प्रशासकीय मान्यता नसताना गरीब दलित कर्मचारी वर्गाकडून पगार न देता फुकट घाणीचे काम करून घेतले त्या बदल त्यांच्यावर ऍट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा का दाखल करू नये?

गरीब कर्मचारी वर्गाचा तात्काळ एक महिन्याचा BVG कंपनी चा पगार व तीन वर्षाचा पी एफ तात्काळ जमा करावा या मागणी सोमवार दि 29 रोजी थाळी मोर्चा व आमरण उपोषण सर्व उपेक्षित कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन करणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. राजू भोसले यांनी सांगितले आहे.अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, व रघुनाथ लोखंडे यांनी सर्व कर्मचारी व कार्यकर्त्यांनी सदर आंदोलना मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.