ब्रम्हपूरी शहरात अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलीसांकडून छापा

32

🔹एकूण 3,17,320 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

🔸अर्हेर-नवरगाव , कूर्झा, चिखलगाव, या गावात अवैध दारूबाबत मोहीम राबवून अवैध दारू विक्रेत्यावर कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्यात आला

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपूरी(दि. 26ऑगस्ट) :- शहरामध्ये असलेले कोटतलाव किनारी झूडपात ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्या लोकांवर ब्रम्हपूरी पोलीसांनी छापा टाकला. त्यांचेकडून नगदी कॅश, मोबाईल व मोटारसायकल ई. वस्तू जप्त करण्यात येउन त्यांचेविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दि. 26 ऑगस्ट रोजी दुपारी ब्रम्हपूरी पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, ब्रम्हपूरी शहरामध्ये असलेले कोटतलावाचे किनारी भागात असलेल्या झूडपाचे आडोसा घेउन काही लोक ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून अवैधरीत्या मोठा जुगार खेळत आहेत. त्यावरून ब्रम्हपूरी पोलीसांनी आपली ओळख लपवून सदर ठिकाणी खाजगी वाहनाने जाउन छापा टाकला. पोलीस पाहून जुगार खेळणारे पळण्याच्या प्रयत्न करू लागताच 11 जणांना पकडण्यात आले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एकत्रितरीत्या 25320 रू. नगदी कॅश, 5 मोटारसायकल 230000 रू., 9 मोबाईल एकूण किंमत 62000 रू.50 रू. ताशपत्ते असा एकूण 317320 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार खेळणाऱ्यांना पोस्टेला आणून त्यांचेवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कार्यवाही श्री. मिलींद शिंदे, उपविभागीय पोलीय अधिकारी, ब्रम्हपूरी व पोलीस स्टेशन ब्रम्हपूरीचे ठाणेदार रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रशांत ठवरे, पोउपनी स्वप्नील गेडाम, नापो / मूकेश गजबे, योगेश शिवनकर, पोशी / नरेश कोडापे, विजय मैंद, संदेश देवगडे, अजय कटाईत यांनी केली.

तसेच पोळा सणाच्या दिवशी पोस्टे हद्दीतील मौजा कूर्झा, चिखलगाव, अहेर नवरगाव गावात अवैध दारूबाबत मोहीम राबवून अवैध दारू विक्रेत्यावर कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही सफौ / विलास गेडाम, पोहवा / अरून पीसें व नापो / नरेश कोडापे यांनी केली. आगामी गणपती व इतर सणांच्या निमीत्ताने पोलीस स्टेशन ब्रम्हपूरी तर्फे अशा प्रकारच्या विविध गुन्हे करणाऱ्यावर धाडी टाकून कडक कार्यवाही करण्यात येईल. असे ब्रम्हपुरी पोलीसाधिकारी कडून सांगण्यात आले.