मुस्तफा पटेल यांनी राष्ट्रवादीला राम राम करुन मुस्लिम समाजाच्या सर्व कार्यकर्त्यां सह श्रावण पा.यांच्या हस्ते भाजपा मध्ये दाखल

36

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)

मुस्तफा पटेल यांनी राष्ट्रवादीला राम राम करुन मुस्लिम समाजाच्या सर्व कार्यकर्त्यां भाजपा मध्ये मा.खा. प्रतापराव_पाटील_चिखलीकर_साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे साहेब यांच्या उपस्थितीत नरसी येथील भाजपा संपर्क कार्यालयात दोन डझन कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

मुस्तफा पटेल हे एक सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजात युवकांच्या केंद्र स्थानी असलेले व्यक्तिमत्व असून नरसी सर्कल मध्ये व नायगाव तालुक्यात पटेल यांची युवकात चांगली फळी असून मुस्लिम समाजाचे युवा वर्ग भाजप कडे आकर्षित करण्यात ते यशस्वी होऊ शकतात या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ला याचा चांगलाच फटका बसल्यानंतर च दोन्ही काँग्रेसचे डोळे उघडतील असे दिसते.येत्या जि.प. निवडणुकीच्या माध्यमातून श्रावण पाटील भिलवंडे यांनी नरसी सर्कल सह तालुक्यात मोर्चे बांधणी करण्यासाठी सज्ज झाले असून जोरदार तयारी चालू केली आहे*

*मुस्तफा पटेल हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग नायगाव विधानसभा अध्यक्ष होते त्याच्या सोबत आशिफ पटेल,शेख सादम, रियाज पटेल, शेख सैलानी,कलीम पटेल, शेख शारुक, सलीम पटेल शेख मुस्तपा, सोनू रसूल शेख, लतिफ शेख, साईनाथ कांबळे, सचिन सूर्यवंशी, राजरत्न नरबाद, शोहेल शेख, शेख सैलानी, शेख शमद, शेख अस्लम, सलामन शेख रामदास दिवडे, ओमकर, ओमानद रजितवाड यांनी पण भाजपात प्रवेश केला या वेळी नरसी चेअरमन मारोती पाटील भिलवंडे, रामभाऊ खनपट्टे, दिगंबर मारोती पाटील भिलवंडे यांच्या सह भाजप चे पदाधिकारी यांची उपस्थिती होती*.