माळी सेवा संघ महीला आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी सौ.स्वप्नाताई लोणकर व पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सौ.सीमाताई पांढरे यांची निवड

26

✒️कुरुल प्रतिनिधी(नानासाहेब ननवरे)

कुरुल(दि.27ऑगस्ट):- माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बारामती येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.स्वप्नाताई लोणकर यांची निवड करण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील कार्याची विशेष आवड , चारित्र्य संपन्नता, संघटनेबद्दल ची आत्मीयता, समाज परिवर्तन बद्दलची तळमळ, संघटनात्मक कौशल्य, निर्णय घेण्याची क्षमता, संघटना बांधणी बद्दल ची तन, मनाने,धनाने असणारी तळमळ, महिला सक्षमीकरण अथवा महिला सबलीकरण आधी कार्यामध्ये अंगी असलेली धडपड पाहता माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याबरोबरच माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व उद्योजक सौ.सीमाताई पांढरे यांची पुणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या त्यांच्या निवडीचे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. संघटनेच्या बांधणी व विस्तारासाठी तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून संघटनेचे काम पोचवु. लोणकर ताई व पांढरी ताई यांची निवड झाल्याबद्दल पुणे जिल्ह्यामध्ये व बारामती पंचकृषी मध्ये कौतुक होत आहे.यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ माळी, संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय जकाते, सावता महाराजांचे सतरावे वंशज रमेश महाराज वसेकर आदींसह माळी सेवा संघ प्रदेश कार्यकारिणी व पदाधिकारी उपस्थित होते.