विदर्भ राज्य घोषित करुन दिक्षाभुमीराज्य नाव द्या – दिपकभाई केदार

🔹ॲाल इंडिया पँथर सेनेचे दिक्षाभुमीराज्यात (विदर्भात) घोंगावणार वादळ

🔸राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाहीर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27ऑगस्ट):; महाराष्ट्रात दलीत, आदीवासी, मागासवर्गीय यांच्यावर वाढलेल्या अत्याचार विरोधात सातत्याने ॲाल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष आवज उठवून पीडितांना न्याय मिळावा म्हणून संघर्ष करीत करीत ‘आम्ही माणसं आहोत, जनावरं नाहित’ इथल्या जातीवादी, विषमतावादी व्यवस्थेला ठणकावून सांगत आहेत. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतांना दुसरीकडे दलीत विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी निर्घृण हत्या केली जाते.

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन रोहित वेमुला जयभीमची घोषणा देतो म्हणून मारला जातो. पारधी समाजाचा कासार कुर्हाडीने घाव घालून संपविला जातो.नागेश पवारची रेल्वे पोलिसांनी हत्या केली, इथे आई-बहिन सुरक्षित नाही, अशा अनेक घटनांना वाचा फोडण्यासाठी पायाला भिंगरी बांधून पिडित घटनेला भेटी देऊन पँथर डरकाळी करुन रस्त्यावरचा संघर्ष उभा करीत आहेत. दिक्षाभुमी राष्ट्रात (विदर्भात) सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द गावातील महिला, पुरुषांना डांबून बांधून भर चौकात मारलं या घटनेला सुद्धा वाचा फोडली आणी न्याय दिला.

अशा शेकडो घटना देशात, महाराष्ट्रात घडत आहेत. भिमसैनिकांचा आवाज यंत्रणेचे बळ वापरुन दाबल्या जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर युवा, तरुण पँथर संघटनेत सहभागी होत असून रस्त्यावर संघर्ष करण्यास पुढे येत आहे. आता रडायचं नाही तर लढायचं, जशास तसे उत्तर द्यायचे अशी भुमिका घेऊन दिक्षाभुमीराष्ट्र (विदर्भात) संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. त्यात नागपूर जिल्हाध्यक्ष विशाल तांबे, ग्रामीण नागपुर जिल्हाध्यक्ष शुभम गोंडाणे, अमरावती जिल्हाध्यक्ष शितलताई गजभिए, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश दुधळे, अमित काकडे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सचिन खाडे, अकोला जिल्हाध्यक्ष परवेज खान आदी पदांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑल इंडिया पँथर सेना तरुणांची अनुसूचित जाती, जमाती, भटके विमुक्त, बौद्ध, आदिवासी, मुस्लिम समूहाची सर्वात मोठी संघटना आहे. राज्यभर संघटन मजबूत आहे, वरील समूहाच्या रक्षणासाठी, मूलभूत प्रश्न व न्याय हक्कांसाठी अविरत संघर्ष करत आहेत. संघटनेची बांधणी मजबूत आहे, जिथे कुठे दलित अत्याचाराच्या घटना घडतील तिथे तात्काळ कार्यकर्ते पोहोचत आहेत. लढत आहेत आणि समाजाच्या रक्षणासाठी कायदेशीर आक्रमक लढा लढत आहेत. सदरील पदाधिकारी कार्यकारिणी ही जिल्ह्यांच्या जिल्हा अध्यक्षांची आहे. अन्यायग्रस्त पीडित असतील, ऑल इंडिया पँथर सेनेत प्रवेश करायचा असेल तर आपापल्या विभागातील जिल्हा अध्यक्षांना संपर्क साधावा. असे जाहीर आवाहन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी केले आहे.

*विदर्भ राज्य घोषित करुन दिक्षाभुमीराष्ट्र नाव द्या – दिपकभाई केदार*
बाबासाहेब आंबेडकरांनी विदर्भाच्या कुशीत नागपूर येथे मोठी क्रांती करीत लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्यानंतर चंद्रपूर येथही धम्मदिक्षा समारंभ पार पडला. या विदर्भाच्या भुमिला महामानव बाबासाहेब आंबेडकर याचा पदस्पर्श झाला. ही भुमी क्रांतीची भुमी आहे. परिवर्तन घडवणारी भुमी आहे. म्हणून विदर्भ राज्य घोषित करुन याला दिक्षाभुमीराष्ट्र नाव द्यावे अशी मागणी करण्यात येणार आहे. यासाठी मोठे व्यापक आंदोलन उभे करुन संघर्ष करणार आहोत अशी भुमिका ॲाल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी घेतली आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED