भरदिवसा गजबजलेल्या पाथर्डी येथील पेट्रोल पंपावरील थरार,महिलेवर प्रियकराचा कोयत्याने ‌हल्ला

29

🔸महिलेला कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करणारा हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात

🔹इंदिरानगर पोलिसांची कामगिरी

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.27ऑगस्ट):- विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध असलेल्या प्रियकर तरुणाने पेट्रोल पंपावरील महिला कर्मचारी एकतर्फी प्रेमातून वार करणारा हल्लेखोर संशयित प्रमोद गोसावी गुरुवारी दिनांक २५ ला पाथर्डी येथील पेट्रोल पंपावर महिलेवर प्राणघातक हल्ला करून फरार झाला होता.गऺभीर जखमी महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.इ॑दिरानगर पोलिसांनी दिलेली माहिती
अशी की,जुबेदा युसूफ खान वय ३७ रा.पाथडी गाव ही पाथर्डी येथील जाधव पेट्रोल पंप येथे कामावर हजर असतांना दुपारी दिड वाजेच्या सुमारास प्रियकर प्रमोद प्रकाश गोसावी वय ३६ रा.अंबुचीवाडी,घोटी ता.इगतपुरी यांने दोघांच्या प्रेम संबंधाच्या वादातून फिर्यादी महिला खान हिच्यावर धारधार कोयत्याने डोक्यावर,पायावर व शरिराच्या इतर भागावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करित फिर्यादिला गंभीर जखमी केले.

जुबेदा युसूफ खान ह्या महिलेचे पतीचे सहा वर्षं पुर्वी निधन झाले असून घोटी येथे वास्तव्यास असताना संशयित प्रमोद गोसावी सोबत प्रेमसंबंध जुळले होते वर्ष भरापुर्वी संशयितांविरुद्ध बलात्कार गुन्हा दाखल झाल्याने ‌सशयित गोसावी कारागृहात असताना जुबेदा युसूफ खान त्याच्या पासून सुटका करण्यासाठी मुंबईत गेलीं होती.सशयित गोसावी गुन्हेगारी पार्श्वभूमी चा असल्याने त्यांच्या सोबत रहाण्यास जुबेदा युसूफ खान नकार देत असल्याने याचा राग आल्याने प्रमोद गोसावी याने भरदिवसा गजबजलेल्या पाथर्डी येथील जाधव पेट्रोल पंपावर खान ह्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला . पेट्रोल पंपावरील कामगारांनी जुबेदा खान ला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांच्या हातात कोयता असल्याने त्याला पकडण्यासाठी कोणी हिंमत केली नाही वरील सर्व प्रकार पंपावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे.

वरिल आरोपी प्रमोद प्रकाश गोसावी याची शोधमोहीम सुरू असतांना इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांना खबर्‍याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हल्लेखोर आरोपी प्रमोद गोसावी हा नाशिक जिल्हा रूग्णालय परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त होताच इंदिरानगर पोलिसांनी साध्या वेशात जिल्हा शासकीय रूग्णालय परिसरात सापळा रचून मोठ्या शिताफिने हल्लेखोरास ताब्यात घेत जेरबंद केले.

वरिल कामगिरी जयंत नाईकनवरे,उपायुक्त विजय खरात,सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख,वरिष्ठ पोलिस निरीक्षक निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डि.एस.वांजळे,सहाय्यक पो.नि.एन.ए.सैय्यद,बोंडे,बोराडे,के.डी.पवार,सागर परदेशी,जावेद खान,सौरभ माळी,ढगे,पगार,मन्सुर शेख आदींनी पार पाडली.