नाशिक मध्ये सी बी आय ची छापेमारी,सीबीआय पथकाच्या रडारवर असलेला जी एस टी उपायुक्त चव्हाणके आठ हजार रुपये लाच घेताना अखेर CBI च्या ताब्यात

28

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.27ऑगस्ट):-निफाड तालुक्यातील एका उद्योजकाचे जीएसटी खाते बंद पडल्याने ते कार्यीन्वीत करण्यासाठी सिडको ञिमुर्ती येथील केंद्रीय जी एस टी उपायुक्त चंद्रकात चव्हाणके यांना आठ हजार रुपये लाच घेताना सीबीआय पथक श्यामल सावंत व पांडे यांनी ताब्यात घेतले आहे. आदिवासी विकास विभागातील एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला तब्बल २८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयनेही नाशिकमध्ये मोठी कारवाई केल्याचे वृत्त आहे. खास म्हणजे, सीबीआयच्या जाळ्यात केंद्रीय जीएसटी कार्यालयातील सुप्रिंटेंडंट चंद्रकांत चव्हाणके हा गळाला लागला आहे. नाशिकमध्ये सीबीआयने कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाची ही पहिलीच आणि अतिशय मोठी कारवाई आहे.

सीबीआयच्या वरिष्ठ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नाशिकध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाचे दोन कार्यालय आहेत.यातील एक राज्य सरकारचे तर दुसरे केद्र सरकारचे,यातील केंद्र सरकारच्या सीजीएसटी विभागाचा सुप्रिटेंडंट चंद्रकात चव्हाणके का सीबीआयच्या हाती लागला.हे कार्यालय सिडकोतील अंबड लिंक रोड येथे आहे.चव्हाणके लाच मागत असल्याबाबत तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाली.जीएसटी कर चोरी संदर्भातील शहानिशा आणि प्रकरणांची हाताळणीचे कामकाज चंद्रकांत चव्हाणके करतो.यातीलच एका कर चोरी प्रकरणात चव्हाणकेने लाच मागितली होती.याच प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे प्राप्त झाली.त्यानंतर सीबीआय पथकाने सापळा रचला.चव्हाणके वर अतिशय बारकाईने नजर ठेवून चव्हाणकेला ताब्यात घेतले.

दरम्यान लाचेचा अकडा मोठा असल्याचे सांगितले जात असून;सीबीआयकडून लवकरच ह्या उपायुक्त चंद्रकात चव्हाणके यांनी आता पर्यंत नक्की किती लाच घेतली, कुठे कुठे घेतली, कुणाकडून आणि कशा साठी घेतली हे अद्याप समोर आले रे नाही माञ लाचेचा आकडा मोठा असल्याचे समोर येत आहे