लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी आयोजित शाडु मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

24

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27ऑगस्ट):-लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे आज नरहारी महाराज मंदिर येथे पर्यावरण पूरक शाडु मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली याप्रसंगी 50 पेक्षा जास्त विद्यार्थी,महिलांनी सहभाग नोंदवला या सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले .आजच्या या कार्यक्रमाला गंगाखेड तालुक्याचे तहसीलदार गोविंद येरमे सर तसेच नायब तहसीलदार सुनील कांबळे सर यांनी उपस्थित राहुन लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे या आणी आजपर्यंत केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले या प्रसंगी सर्व उपस्थिताकडुन प्रशिक्षक लाभलेले संतोष पाठक यांचा लॉयन्स क्लब इंटरनॅशनल चे सर्टिफिकेट देउन सन्मानित करण्यात आले.

या कार्यशाळेमध्ये सर्वांनी उत्कृष्ट गणेशमूर्ती बनवल्या पण त्यापैकी सर्वोत्कृष्ट तिन गणेशमूर्ती बनवल्या त्यापैकी प्रथम म्हणून रविराज सचिन जोशी द्वितीय म्हणून भार्गवी नळदकर तर तृतीय जामगे याना प्रमाणपत्र तसेच 501,301,201 बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमाला लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी चे अध्यक्ष गोविंद रोडे, सचिव भगत सुरवसे कॅबिनेट ऑफिसर अतुल दादा गंजेवार तसेच महिला फोरम च्या अध्यक्षा सौ कविता साळवे उपाध्यक्ष रेणु घन सचिव इंदुमती कदम तसेच माधुरी गंजेवार,जामखेड मॅडम, अंबेकर मॅडम, बंडु बॉस घुले, चंद्रकांत गादेवार, मयुर कुलकर्णी, प्रकाश घण, मारोती साळवे, विठ्ठल शिंदे, अभिजीत चौधरी, महेन्द्र वरवडे, अदिती साळवे,नांदुरकर सर तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते