✒️शेख आतीख (गेवराई तालुका प्रतिनिधी)

गवराई (5 जुलै) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तमाम ओबीसी समाजाची अस्मिता ना.छगनरावजी भुजबळ यांच्या विषयी अर्वाच्य भाषेत अपशब्द वापरून महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावून वाद निर्माण करण्याचे दुष्कृत्य केल्याप्रकरणी आबासाहेब सवासे रा.गेवराई जि.बीड याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी.

     यासाठी अ. भा.महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष अॅड.सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष बापू गाडेकर व उपाध्यक्ष गणेश काळे यांनी दिली.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED