कोरोना संकट काळात सक्रिय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेतनात वाढ द्यावी-विजयकुमार भोसले

8

🔸मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहराज्यमंत्री ना.सतेज उर्फ बंटी पाटील यांना निवेदन सादर

✒️कुंभोज (पुरोगामी संदेश नेटवर्क)

कुंभोज (दि.5जुलै ) कोरोना संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस सक्रीय व सेवाभावी उद्देशाने काम केले आहे. त्यांना प्रोत्साहन म्हणून व कुटुंबातील सदस्यांना समाधान मिळावे म्हणून त्यांच्या वेतनात वाढ करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाचे राज्य समव्यक विजयकुमार भोसले यांनी केली.या संदर्भातील निवेदन भोसले यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे व गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांना पाठविले आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूच्या लढ्यामध्ये पोलीस ,डाॅक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता 24 तास काम करत आहे. महाराष्ट्र शासनाने सर्वांना विमा योजना जाहीर केला आहे. त्यानुसार त्यांची काही बरे वाईट झाले तर त्यांना त्यांचा लाभ मिळेल.
ही जरी त्यांना आपण केलेली मदत खूप मोठी असली तरी या पेक्षा अधिक गरजेचे गोष्ट म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वजण लढत असताना त्यांना एक मानसिक आधार म्हणून व त्यांचे मनोबल वाढण्यासाठी त्या सर्वांच्या पगारामध्ये वाढ करणे आवश्यक ठरेल ,त्यांच्या कुटुंबालाही त्यामुळे सरकार त्यांच्या पाठीमागे उभे आहे.असे ठामपणे वाटेल.
पोलिस डॉक्‍टर आणि परिचारिका यांच्या पगारामध्ये वाढ करावी.परंतु वाढ शक्‍य नसल्यास कोरोना भत्ता म्हणून काही वाढीव रक्कम देण्याची व्यवस्था करावी.अशी विनंती विजयकुमार भोसले यांनी केली आहे.