मुक्तीप्रतिष्ठान येवला या संस्थेची बैठक संपन्न

55

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.28ऑगस्ट):- मुक्ती प्रतिष्ठान येवला या संस्थेची सर्व साधारण सभा शनिवार दिनांक 27/ 8 /2022 रोजी येवला मुक्ती भूमी येथे सर्व सभासदांनी क्रांती स्तंभाला वंदन केले बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन करून तथागत भगवान बुध्दांच्या रुपास पुष्प वाहुन भदन्त श्रध्दानंद थेरो यांनी त्रिसरण पंचशील दिले संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आद. वाय.डी. लोखंडे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी संस्थेचे सभासद अजीव सभासद आश्रयदाते हितचिंत व देशातील, राज्यातील कला क्रीडा सांस्कृतीक, कामगार शैक्षणिक समूहातील सिनेमासृष्टीतील राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर स्त्री-पुरुषांचे कोरोनामुळे व इतर कारणांमुळे दुःखद निधन झालेले असल्याने त्या सर्वांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संस्थेचे महासचिव आयु.सुनील निकाळे यांनी सन 2022 /23 चे जमाखर्चाचे अंदाजपत्रक सभासदांसमोर मांडले सण 2021 बावीस या आर्थिक वर्षातील कामकाजासंबंधी झालेल्या जमाखर्चास तेरीज ताळेबंद पत्रकास मंजुरी देण्यात आली मुक्ती भूमी येवला सर्वे नंबर 4 येथील क्रांती स्तंभाचे संपूर्ण बांधकाम लोकवर्गणीतून पूर्ण करण्यात यावे धर्मांतर घोषणेच्या 87 वा वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मांडणी केली मुक्ती प्रतिष्ठान येवला या संस्थेच्या विकास कामांसाठी आर्थिक तरतूद करणे मुक्ती प्रतिष्ठान येवला या संस्थेचे सन 2009 पासून ते आज पर्यंत संस्थेचे चेंज रिपोर्ट फेरफार बदल अर्जासंबंधी जी मे. धर्मादाय आयुक्त नाशिक यांचे कोर्टामध्ये केस नंबर 505 ते 511 ही केस अंतिम टप्प्यात आहे त्यासंबंधी विचार विनिमय करणे व आर्थिक तरतूद करणे वरील विषयांच्या अनुषंगाने संस्थेचे चालू असलेल्या चेंज रिपोर्ट फेरबदल केस संदर्भात दोन्ही गटात विचार विनिमय करून परस्पर सहमतीने सखोल चर्चा करून बहुमताने निर्णय घेण्यात यावा असे ठरविण्यात आले.

या वेळी आद.वाय.डी.लोखंडे गुरुजी यांनी अनेक प्रश्नांची सोडवणूक केली प्रमुख उपस्थिती मा. दत्तू वाघ भागिनाथ पगारे संजय भरीत प्रा.डी एम वाकळे सर पंकज डी खरे के के बच्छाव पोपट शिरसाट सुभाष आव्हाड निंबाजी निकाळे भास्कर पगारे कैलास दामोदर वाघ दिलीप अहिरे दिलीप पगारे बाळासाहेब शिरसाट भगवान साबळे बबन काळे बाजीराव गायकवाड दादाभाऊ काऊतकर हरिभाऊ अहिरे कैलास केदारे प्रतापराव साळुंखे रत्नमाला ढेंगळे भैय्यासाहेब गरुड मुरलीधर निकाळे अनिल सोनवणे आर बी ढेंगळे भगवान बच्छाव शिवदास म्हसदे भीमराव गायकवाड प्रवीण म्हसदे पंकज थोरात महेंद्र गायकवाड विजय साळवे आर आर जगताप महेंद्र पगारे ईत्यादी मान्यवर सभासद उपस्थित होते