चिमुर पोलिसांनी केली दारू तस्कराला इंडिका गाडीसह अटक

14

✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमुर (दि-5जुलै)गोपनीय माहितीचा आधारावर दारू तस्करावर पाळत ठेऊन चिमुर पोलिसांनी अवैद्य दारुसह चंद्रगुप्त मांडवकर  यास अटक केली ही कारवाई दि-4 जुलै रोजी करण्यात आली.

 चिमूर येथे अवैद्य दारू तस्कर चंद्रगुप्त मांडवकर हा आपल्या पांढऱ्या रंगाच्या इंडिका क्र MH40 KR 0228 मध्ये देशी विदेशी दारूचा माल विक्रीकरिता वाहतूक करून आणत आहे या गोपनीय माहितीवर मासळ चौक चिमूर येथे रात्रौ सापळा रचण्यात आला होता.आरोपी चंद्रगुप्त रमेश मांडवकर वय 28 वर्ष रा.ठक्कर वार्ड चिमूर हा आपली इंडिका कार क्र. MH 40 KR 0228 ने येतांना दिसताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन वाहनांची तपासणी केली. त्यात देशी विदेशी दारूचा साठा असा एकूण 4,54,000 रुपयेचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली.
ही कारवाही उप विभागीय पोलीस अधिकारी अनुप तारे,पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे पो.स्टे. चिमूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक अलीम शेख, पोहवा विलास सोनूले, विलास निमगडे, पोशी सतीश झिलपे , दगडू सरवदे चानापोशी कैलास वनकर यांनी पार पाडली.