कंपनीने रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोटर सायकल धडकली

44

🔸”एकाची मयत तर एक जखमी”

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 29ऑगस्ट):- औरंगाबाद – माहूर नॅशनल हायवे रोडवरील ब्राम्हणगांव येथे गायपांदन पुलाजवळ बांधकाम कंपनीने रस्त्यावर टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर मोटर सायकल धडकल्याने गोविंद कानकाटे अं.वय 70. रा . सोनारी ता. हिमायतनगर हे वृध्द जागीच ठार झाले तर मोटर सायकल चालक कृष्णा कानकाटे हा गंभीर जखमी झाला आहे.

रात्री 7:10मी चे सुमारास हा अपघात झालेला असतांना यावेळी 7:50मी झाले तरीही शासकिय आरोग्य सेवेची रुग्णवाहिका यावेळेपर्यन्त पोहचली नव्हती! अपघाताच्या 1 तासा नंतर रुग्णवाहिका पोहचली.

सदर मयत गोविंद कानकाटे यांचे भाऊ वारल्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला धानोरा (साचलदेव) ता. उमरखेड येथे जात असतांना बांधकाम कंपनीच्या संथगतीने चालू असलेल्या कामामुळे रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्याला धडक लागून हा दुर्दैवी अपघात घडला.

विशेष म्हणजे याच जागेवर मातीच्या ढिगाऱ्या मुळे एका महिन्यात तीन अपघात झाल्याचे गावकऱ्यांनी सांगीतले.