मागण्या मान्य केल्याने सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे : अ‍ॅड. राजू भोसले

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9975686100

म्हसवड(दि.30ऑगस्ट):- म्हसवड नगरपालिका सफाई कामगारांचा तीन वर्षाचा पी. एफ. व एक महिन्याचा BVG कंपनीचा पगार नगरपालिका मुख्याधिकारी यांनी तात्काळ द्यावा या मागणी साठी म्हसवड शहरातून थाळी नाद मोर्चा काढून नागपालिकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक – सचिव अ‍ॅड. राजू भोसले यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आले.यावेळी आंदोलनास पाठींबा देऊन माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विश्वबर बाबर, नगरसेवक विकास गोंजारी, दलित पँथर चे प्रमोद लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते महादेव सरतापे, आर पी आय चे महेश लोखंडे, नगरसेवक अकील काझी, राजेंद्र माने, अशोक काळे, युक्रांद चे राजकुमार डोंबे, अनिल सरतापे, सतीश भोसले यांनी मोर्चा चे नेतृत्व करून उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी सुरुवातीला मोर्चा ची सुरुवात सिद्धनाथ मंदिरा पासून शिवाजी चौक चौका पर्यंत महापुरुषांच्या नावाने घोषणा देत व थाळी वाजवत येऊन ढोल ताष्याच्या गजरात करण्यात आली.सफाई कामगारांनी छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. यावेळी अ‍ॅड. राजू भोसले आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. व नंतर मोर्चा घोषणा देत… हाय हाय कर्मचाऱ्यांचा पगार खाणाराचे करायचे काय…. पी एफ व पगार मिळालाच पाहिजे, कोण म्हणतंय देत नाय…. अश्या घोषणा देत व थाळी नाद करीत मोर्चा महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास स्थिरावला. या ठिकाणी म. फुले, छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जय जय कार करणाऱ्या घोषणा देऊन कर्मचाऱ्यांनी परिसर दनानून सोडला.
येथून मोर्चा नगरपालिका नगरपालिके समोर आल्यावर मोर्चा चे रूपांतर उपोषण करण्यासाठी करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड. राजू भोसले, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. विश्वबर बाबर, नगरसेवक विकास गोंजारी, दलित पँथर चे प्रमोद लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते महादेव सरतापे, आर पी आय चे महेश लोखंडे, यांनी भाषणे केली. तसेच नगरपालिका प्रशासना बरोबर चर्चा करण्यात आली.

यावेळी मुख्याधिकारी सचिन माने यांनी म्हसवड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या उपस्थितीत अ‍ॅड. राजू भोसले यांना सफाई कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा बीव्हीजी कंपनी चा पगार व तीन वर्षाची पीएफ ची रक्कम देण्याचे लेखी पत्र दिले. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी राजू भोसले यांनी कर्मचाऱ्यांना त्रास झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देऊन आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.यावेळी अनिल सरतापे, योगेश आवळे, अमर लोखंडे, रघुनाथ लोखंडे, लक्ष्मी सरतापे, मंगल सरतापे, सोजाबाई सरतापे, मंगल लोखंडे, यांच्या सहित बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक योगेश आवळे यांनी केले. सूत्रसंचालन अमर लोखंडे व रघुनाथ लोखंडे यांनी केले. शेवटी आभार अनिल सरतापे यांनी मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED