गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसील प्रशासनाकडून फसवणूक

32

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.30ऑगस्ट):-जून जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश काढूनही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोक्यावर जाऊन पंचनामे न करता तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांनी कार्यालयात बसूनच नुकसान झाले नाही असे नीरकं आव्हाल दाखवून संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे नुकसान झाले नाही असा तहसीलदारा मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निरंक अहवाल दाखल केल्याचे उघड आज दिनांक 29/ 8/ 2022 रोजी डोंगरी जनपरिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे डोंगर भागात जमिनीसह शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.

यासाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर भव्य स्वरूपाचे धरणे आंदोलन केले असता आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांना आमदार रत्नाकर रावजी गुट्टे यांनी भेट देऊन तहसीलदार यांना आंदोलन स्थळी बोलावून आंदोलन कर्त्या डोंगर भागातील शेतकऱ्यांसोबत झालेल्या नुकसानी बाबत चर्चा केली असता तहसीलदार यांनी असे सांगितले की तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्यामार्फत गंगाखेड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकांची नुकसानीची पाहणी केली असून संपूर्ण तालुक्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले नाही असा निरंक अहवाल माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याचे तहसीलदार यांच्या बोलण्यावरून समजते डोंगर भागासह संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसील प्रशासनाकडून कोणत्याही गावात प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक गेले नसून संबंधितांनी तहसीलदाराच्या कृपाशीर्वादाने कार्यालयात बसूनच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले नाही.

अशे निरंक पंचनामे करून अहवाल सादर केलेला असून डोंगर भागासह सर्व शेतकऱ्यांची फसवणूक केलेली असल्याचे डोंगरी जन परिषदेच्या आंदोलनामुळे उघडकीस आले आहे जून महिन्यात गोगलगायी मुळे व वनुगाईमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्यातच जुलै महिन्यात सततच्या पावसामुळे शेती सहशेती पिकाचे अतोनात नुकसान होऊनही तहसील प्रशासनाने तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले नाही असा निरंक अहवाल देऊन फसवणूक केली आहे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या करणाऱ्या तहसीलदार तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी डोंगरी जनपरिषदेच्या वतीने डोंगर भागातील प्रत्येक गावा गावातील शेतकऱ्यांच्या तक्रारी माननीय मुख्यमंत्री महसूल मंत्री कृषी मंत्री विभागीय आयुक्त प्रधान सचिव यांच्याकडे करणार असून खोटे पंचनामे करून नुकसान न झाल्याबाबत निरंक अहवाल देणाऱ्या तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जाणार आहे संबंधितावर निलंबनाची कार्यवाही न झाल्यास डोंगरी जनपरिषदेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आज दिनांक 29 8 2022 रोजी सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत.

यासाठी धरणे आंदोलन केले असता वरील प्रकार उघडकीस आला या आंदोलनात डोंगर भागातील बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते त्यात डोंगरी जनपरिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे संयोजक आश्रुबा दत्तराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर बालासाहेब प्रभाकर सोडगीर शंकर अण्णा रुपनर गोपीनाथ भोसले बळीराम मुंडे जगन्नाथ मुंडे प्रकाश मुंडे पिंपळदरीकर बंकट मुंडे रामकृष्ण मुंडे विनायक दहिफळे दगडोबा पवार बालासाहेब गुट्टेसिताराम देवकते दशरथ मोठे भगीरथ फड योगेश फड बिबन खॅं पठाण केशव भेंडेकर विजयकुमार गरड बालासाहेब रंगनाथ सोडगीर रामकिसन मुंडे भरत सोडगीर लक्ष्मण देवकते आप्पा रुपनर वाल्मीक केंद्रे हरिभाऊ आवचार मुंजाजी तिडके पद्माकर मरगीळ लक्ष्मण पवार बोर्डा नाथराव श्रीराम घरजाळे गणेश घरजाळे विठ्ठल खांडेकर मनोहर भंडारी गणेश सिसोदे ज्ञानेश्वर मुंडे विश्वनाथ भोसले भागवत शिसोदे दिनकर मुंडे नारायण मरगिळ गोविंद घरजाळे शंकर तरडे मानसिंग सिसोदे आधी असंख्य शेतकरी बांधव धरणे आंदोलनात सहभागी झाले होते