राष्ट्रीय बंजारा परिषदेवर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड

25

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.30ऑगस्ट):-बंजारा समाजाची धर्मसत्ता मजबूत करुन गोर बंजारा समाजाला राजसत्तेकडे नेण्यासाठी भगवंत सेवक, दानशूर नेते, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरनिय किसनभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली शर्थीचे प्रयत्न व आवाहन करणारी देशातील सर्वात मोठी व चर्चेत असलेली संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या बीड जिल्हा गेवराई तालुक्याची कार्यकारिणी निवडण्यासाठी रविवार दि.२७ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण होते. जिल्हा अध्यक्ष बाजीराव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत युवा आघाडी, विद्यार्थी आघाडी,सोशल मीडिया आघाडी आणि फादर बॉडीची तालुका, जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.गेवराई तालुक्यातील चाळीस पेक्षा तांड्यावरील बैठकीला उपस्थित होते.त्यापैकी पंचवीस पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.भगवंत सेवक, गोर जननायक,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरनिय किसनभाऊ राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शंभर पेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फुर्तीने बैठकीला उपस्थित होते.

राष्ट्रीय बंजारा परिषदेला मजबूत करुन बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणे हि काळाची गरज असल्याचे मत नियुक्ती पत्र मिळालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलें.या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून महंत सुंदरसिंग महाराज, जिल्हा संघटक अमर राठोड, युवा जिल्हाअध्यक्ष कृष्णा राठोड,बीड तालुका अध्यक्ष बाळराजे राठोड उपस्थित होते. तांडा येथे गोर धर्माची शाखा स्थापन करण्याचे आणि गेवराई तालुक्यातील ज्या तांड्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत,जोड रस्ते, पिण्याचे पाणी,स्मशानभूमी, मतदान केंद्र अंगणवाडी,आरोग्य केंद्र नाही अशा तांड्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व सरकरचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने संयुक्त रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
या प्रसंगी गेवराई तालुका सचिव रमेश राठोड,युवा आघाडी अध्यक्ष दत्ता राठोड,गोर धर्म प्रचारक लक्ष्मण महाराज,अचित महाराज, हरिभाऊ आडे महाराज, साहेबराव राठोड, राजाभाऊ जाधव,शामराव पवार यांची विशेष उपस्थिती होती.

मारोती पवार,राजेंद्र जाधव, पवन जाधव,मनोज जाधव, एकनाथ आडे, प्रकाश राठोड, रविंद्र राठोड,सुजीत पवार,प्रदिप राठोड, पत्रकार विष्णू भैय्या राठोड,रामेश्वर जाधव,अमोल राठोड, विकास राठोड, बाळराजे जाधव,बबन राठोड व इतर कार्यकर्त्यांची विविध पदांवर निवड करण्यात आली.विद्यार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रीय बंजारा परिषदेचे गेवराई तालुका अध्यक्ष संजय चव्हाण यांनी सदरील बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे झंझावात निर्माण होत असून उपेक्षित बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी अविरत संघर्ष करण्याची स्पष्ट भूमिका संघटनेनी घेतली आहे.
संजय चव्हाण यांनी आभार मानले..