चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या २४ तासात कोवीड -१९ संक्रमित तीन रुग्ण आढळले

  55

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  ?चंद्रपूर बाधितांची संख्या १२१ वर

  ?नव्या बाधितांमध्ये ऊर्जाग्राम
  परिसरातील कुटुंबातील दोघे
  चिमूर तालुक्यातून एक बाधित

  ?आतापर्यत ६२ कोरोनातून बरे
  ?९ बाधितांवर उपचार सुरू

  चंद्रपूर (दि:-5 जुलै)जिल्ह्यातील गेल्या २४ तासात कोवीड -१९ संक्रमित तीन रुग्ण आढळून आल्याने आत्तापर्यंत कोवीड संक्रमित झालेल्या बाधितांची संख्या १२१ झाली आहे. यापूर्वीचे ६२ बाधित रोग मुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ५९ बाधित उपचार घेत आहेत.
  जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार ऊर्जा ग्राम येथील ३५ वर्षीय महिला कर्मचारी यांचा काल घेतलेला स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यापाठोपाठ त्यांचे ४० वर्षीय पती यांचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कुटुंबातील अन्य तिघांचा देखील स्वॅब घेण्यात आला आहे.
  चिमूर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह पहिली घटना पुढे आली आहे. तालुक्‍यातील सोनेगाव येथील ३५ वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर येथून आल्यानंतर १ जुलैपासून संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या नागरिकाचा स्वॅब २ जुलै रोजी घेण्यात आला होता. या तीन नागरिकांमुळे रविवारी सायंकाळपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह संख्या १२१ वर गेली आहे.
  जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) ३ जुलै ( ११ बाधित ) ४ जुलै ( एकूण ५ ) आणि ५ जुलै ( एकूण ३ ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १२१ झाले आहेत. आतापर्यत ६२ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १२१ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ५९ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.