रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज कुरुल, हायस्कूलची आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती उत्तुंग यशाची परंपरा कायम

27

✒️नानासाहेब ननवरे(कुरुल प्रतिनिधी)

कुरुलदि.30ऑगस्ट):- ता मोहोळ येथील रयत शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल ची यशाची परंपरा कायम राज्य परीक्षा परिषदेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना २००७-०८ पासून इयत्ता आठवीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्यात येते. ज्या पालकांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते.विद्यार्थ्याच्या पालकाला २०२०-२१च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा लागेल.

सातवीत किमान ५५ टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झालेला असावा. तर विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालयात, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी परीक्षेला अपात्र आहेत. लेखी परीक्षेतून विद्यार्थ्यांची गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड होते. पात्र विद्यार्थ्यांना दर वर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

NMMS परीक्षा निकाल 2022* सलग दुसऱ्या वर्षी उत्तुंग यश,एकूण परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी – 41* परीक्षेत पात्र/ उत्तीर्ण विद्यार्थी – 24* NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी-6* सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -7 विद्यार्थी* 6 विद्यार्थ्यांना 48000 रू प्रमाणे 2,88,000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार.
सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र – 7 विद्यार्थी*
प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे 2,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार. एकूण 5,56,800 रू शिष्यवृत्ती मिळणारआहे*
NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी 1) कुमारी शिंदे शर्वरी**2) ननवरे आदर्श*3) माने आदित्य*4) लांडे दक्ष* 5) पाटील हर्षद*
6) कुमारी ननवरे विद्या*

*सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र – 7 विद्यार्थी*
1)*कु.डोंगरे अमृता ज्ञानेश्वर**2)कु.पाटील श्रावणी हनुमंत*3)कु. जाधव भाग्यश्री ज्ञानदेव**4)कु .शिरसागर स्वप्नाली सिद्धेश्वर*5)कु.चव्हाणसंस्कृती विकासरत्न**6) अवताडे समाधान संभाजी**7) जाधव पियुष अमरदीप*

*या सर्व विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सौ वैशाली गायकवाड (विज्ञान विषय),बुद्धिमत्ता विषयासाठी सौ सुर्वे मॅडम, गणित विषयासाठी सौ माने मॅडम, समाजशास्त्र विषयासाठी श्री आशिष बिराजदार सर यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विठ्ठल शिवणकर साहेब, विभागीय चेअरमन श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री.राजेंद्र साळुंखे साहेब, विभागीय अधिकारी श्री. गोडसे साहेब , स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलास मारुती पाटील, श्री शत्रुघ्न जाधव, श्री लिंगेश्वर निकम, श्री दत्तात्रय बोंगे, विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री राजेंद्र नेपाळ सर, पर्यवेक्षक श्रीयुत मोहिते सर, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ माजी विद्यार्थी संघ आणि आदींसह कुरुल पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.