मुजरा लघुपट काळजाला भिडणारा : ॲड. प्रकाश मोर

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.30ऑगस्ट):- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनपट विषयीची मांडणी मोठ्या पडदावर येणे ही काळाची गरज आहे. राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्षात असे प्रयत्न होणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल. राजर्षी शाहुंच्या विचारांना केंद्रबिंदू ठेऊन तयार करण्यात आलेला मुजरा हा लघुपट काळजाला भिडणारा आहे असे मत ॲड. प्रकाश मोरे यांनी व्यक्त केले. ते निर्मिती फिल्म क्लब आणि शिवतेज फिल्म इंटरनॅशनल यांच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनपटावरील मुजरा या लघुपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव मुळीक हे होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जीवन कार्यावर सर्वसामान्यांना वाटणाऱ्या आपुलकी दर्शवणारा मुजरा द सॅल्यूट हा लघुपट निर्मिती फिल्म क्लब आणि शिवतेज फिल्म सेंटर नॅशनल या कोल्हापूरच्या संस्थांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन या ठिकाणी या लघुपटाचा प्रीमियर शो संपन्न झाला. यावेळी डॉ. प्रविण कोडोलीकर, मिलिंद यादव, प्रा. टी. के. सरगर, डॉ. शोभा चाळके, प्रा. मिनल राजहंस, ॲड. करुणा विमल, डॉ. दयानंद ठाणेकर, डॉ. नंदकुमार गोंधळी, डॉ. स्वप्निल बुचडे, डॉ. अविनाश वर्धन, अब्बास शेख, सनी गोंधळी यांच्या सह प्रीमिअर शो ला मोठया संख्येने कलाकार व शाहू प्रेमीं उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुजरा लघुपटाचे दिग्दर्शक अनिल म्हमाने यांनी केले तर लघुपटामागील भूमिका डॉ. कपिल राजहंस यांनी मांडली. लघुपटात काम केलेल्या आदित्य म्हमाने, शिवतेज राजहंस, अमिरत्न मिणचेकर, राधिका पाटील, तक्ष उराडे, नारायणी जप्तनमुलुख, अधिराज पाटील, दुर्वा राजहंस, आराध्या पोतदार, अक्षया कवर, ओम नाझरे, सानवी कांबळे, सिद्धेश कुपेकर, सिद्धिक मुजावर, अनुष्का माने या बाल कलाकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED